Viral News: भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा तऱ्हेने त्यासंबंधीचे प्रसंग आणि व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरदेवाची कार ट्रॉफीकमध्ये अडकते, त्यामुळे त्याच्या लग्नाचे वऱ्हाड पुढे निघून जाते. त्यानंतर नवरदेवाला ट्रॉफीकमधून पायपीट करावी लागते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
शौर्य२३ नावाच्या पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नवरदेव आपल्या वऱ्हाडापर्यंत पोहोचण्यासाठी ट्र्रॅफिकमधून धावताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचे वय ३० वर्षे आहे आणि लग्न करण्याची ही तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे. पंरतु, ट्रॅफिक पाहून अविवाहित राहणेच योग्य असल्याचे वाटत आहे.’
हा व्हिडिओ २४ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला, तेव्हापासून या व्हिडिओला २४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या घटनेची नेमकी तारीख आणि ठिकाण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या क्लिपमध्ये लग्नाचा पूर्ण पोशाख परिधान केलेला नवरदेव गर्दीच्या रस्त्यावरून पायी जात आपले वऱ्हाड गाठण्याचा प्रयत्न करत आहे.
या व्हिडिओवर कमेंटचा पूर आला आहे. अनेकांना हा व्हिडिओ हास्यापद वाटला. एका युजरने गमतीने लिहिले की, ‘कल्पना करा की, स्वत:च्या लग्नात नवरदेवाला त्याच्या वऱ्हाडाचा पाठलाग करावा लागतोय… भाऊला हा अनुभव कसा वाटला.’ आणखी एकाने म्हटले की, ‘प्रत्येक प्रेमकथेत ट्रॅफिक हा सर्वात मोठा खलनायक असतो. हा बिचारा अक्षरशः आपल्या लग्नासाठी धावत आहे!’ एका युजरने उपहासाने कमेंट केली, ‘कदाचित वऱ्हाड्यांनी नवरदेवाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असेल, इतक्या ट्रॅफिकमधून जर तो लग्न मंडपात पोहोचला तर तो वधूसाठी योग्य आहे!’ एकाने म्हटले की, ‘भाऊ खरोखरच त्याच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात गेला.’ आणखी एकाने लिहिले की, ‘म्हणूनच लग्नात नेहमी वधूची बाजू घेतली पाहिजे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना समजले असेल.’
संबंधित बातम्या