डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना VIDEO मध्ये कैद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना VIDEO मध्ये कैद

डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना VIDEO मध्ये कैद

Mar 08, 2024 09:04 PM IST

Heart Attack Death : उत्तरप्रदेशातीलएटा जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे भावाच्या वरातीतडीजेवरील गाण्यांच्या तालावर नाचताना एक १५ वर्षीय मुलगा अचानक जमिनीवर कोसळला व जागीच त्याचा मृत्यू झाला.

डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू
डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Heart Attack : हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. १० वर्षाच्या बालकापासून वृद्धापर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे भावाच्या वरातीत डीजेवरील गाण्यांच्या तालावर नाचताना एक १५ वर्षीय मुलगा अचानक जमिनीवर कोसळला व जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण होते. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले व लग्न घरावर शोककळा आली. घरात आक्रोश होऊ लागला.

एटा जिल्ह्यातील मुबारिकपूर गावात धर्मेंद्र सिंह यांचे पुतणे विशेष सिंह याची वरात ७ मार्च रोजी मैनपुरीला जाणार होती. घरात आनंदाचे वातावरण होते. कुटूंबाने नातेवाईक व गावकऱ्यांसाठी ६ मार्च रोजी भोजनाची व्यवस्था केली होती. रात्रीच्या वेळी सर्वजण डीजे लावून नाचत होते.

दरम्यान नातवाईकांनी विशेषचा चुलत भाऊ सुधीर (१५ वर्षे) याला नाचण्यासाठी बोलावले. नाचता नाचताच तो जमिनीवर कोसळला. काय झाले आहे कोणालाच कळत नव्हते. खूप वेळ तो जमिनीवर तसाच पडल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

सुधीरच्या मृत्यूची बातमी कळताच घरात आक्रोश सुरू झाला. लग्न घरात वराती ऐवजी अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलाचे वडील धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, डीजे वाजत होता व सर्वजण नाचत होते. मुलगा नाचत होता व अनाचक कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना तेथे उभ्या असलेल्या कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. मुलाच्या मृत्यूनंतर लोकांनी सांगितले की, मुलगा निरोगी व द्रष्टपुष्ट होता. दिवसभर तो लग्नकार्यासाठी काम करत होता. रात्री जेवण झाल्यानंतर साडे १० वाजता डिजेवर तो नाचत होता. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाले.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर