नातू IAS अधिकारी अन् मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, तरीही वृद्ध दाम्पत्यानेअन्नावाचून संपवले आयुष्य
IAS officer Grandparents suicide : हरियाणा राज्यातील चरखी दादरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा कोट्याधीश तर नातू प्रशासकीय अधिकारी असतानाही वृद्ध दाम्पत्याने अन्न-पाण्याविना आपलं जीवन संपवलं आहे.
हरियाणा राज्यातील चरखी दादरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आयएएस (IAS) विवेक आर्य यांच्या आजी-आजोबाने बुधवारी रात्री आत्महत्या केली. वृद्ध दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुसाइड नोट ही लिहिली होती. त्यांनी अंतिम श्वास घेण्यापूर्वी ही चिट्ठी पोलिसांना सोपवली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटूंबातील चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ही घटना बाढडामधील शिव कॉलनीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपी येथे मूळचे राहणारे ७८ वर्षीय जगदीश चंद्र आर्य आणि ७७ वर्षीय भागली देवी आपला मुलगा वीरेंद्र आर्य याच्याकडे रहात होते. वीरेंद्र यांचा मुलगा विवेक आर्य २०२१ मध्ये आयएएस बनला होता. त्याला हरियाणा केडर मिळाले असून सध्या तो प्रशिक्षण घेत आहे.
दरम्यान वृद्ध दाम्पत्य जगदीश चंद्र आणि त्यांच्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व याची माहिची पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर जगदीश यांनी पोलिसांना सुसाइड नोट सोपवले. दामपत्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना दादरी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
वृद्ध दाम्पत्याच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले आहे ?
जगदीश यांनी सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे की, "मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझे दु:ख सांगतो, माझ्या मुलाकडे बाढडा येथे ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याच्याकडे मला देण्यासाठी दोन रोटी (भाकऱ्या) नाहीत. मी माझ्या लहान मुलाजवळ रहात होतो. ६ वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला. काही दिवस ती आम्हाला खायला देत होती. मात्र त्यानंतर तिनेही आमच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. मी विरोध केला असता आम्हाला मारहाण करून घरातून हाकलून दिले.”
"मी दोन वर्षे अनाथ आश्रम मध्ये राहिलो. त्यानंतर परत आल्यावर त्यांनी घराला कुलूप लावले. दरम्यान माझ्या पत्नीला लकवा मारला आणि आम्ही दुसऱ्या मुलाकडे रहायला आलो. त्यानंतर काही दिवसांनी त्यानेही आम्हाला घरात ठेवायला नकार दिला व आम्हाला शिळे अन्न देण्यास सुरुवात केली. मात्र हे गोड विष मी किती दिवस खाणार, त्यामुळे मी सल्फासची गोळी खाल्ली आहे. माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सूना एक मुलगा व एक पुतण्या आहे.
"जितके अत्याचार या चार जणांनी माझ्यावर केले आहेत, कोणीही मुलगा आपल्या आई-वडिलांवर करणार नाही. माझी प्रार्थना आहे की, इतका अत्याचार आई-वडिलांवर करू नये. सरकार व समाजाने यांना दंड द्यावा. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बँकमध्ये माझ्या दोन एफडी आणि बाढडामध्ये एक दुकान आहे, ते आर्य समाज बाढडा यांना द्यावे.
दोन महिलांसह चार लोकांवर गुन्हा दाखल -
या प्रकरणी डीएसपी वीरेंद्र श्योराण यांनी सांगितले की, जगदीश चंद्र यांनी खासगी रुग्णालयात पोलिसांना पत्र सोपवले आहे. ही सुसाइड नोट मानली जाऊ शकते. मृताने कुटूंबातील लोकांवर आरोप करत विष प्यायले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.