हरियाणातील एक वृद्ध व्यक्तीने आजोबा झाल्याच्या खुशीत मोठे दान दिले आहे. घरात नातवाच्या जन्म झाल्यानंतर आनंदाच्या भरात या व्यक्तीने १०० वर्गमीटरचा जवळपास १५ लाखाचा प्लॉट किन्नरांना भेट रुपात दिला. इतकी अमूल्य भेट मिळाल्यानंतर किन्नरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. परिसरात ही गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे.
गुरुग्रामजवळ असलेल्या रेवाडी शहरातील सती कॉलनीत राहणाऱ्या शमशेर सिंह यादव यांना नातवाच्या जन्मानंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या किन्नरांना १५ लाखांचा प्लॉट दिला. शमशेर सिंह मोठे जमीनदार असून त्यांची ही वडिलोपार्जित जमीन आहे.
शमशेर सिंह यांचा मुलगा प्रवीण यादव यांना पहिला मुलगा झाला. हे समजताच परिसरातील किन्नर सपना गुरु, हिना, कोमल आदि त्यांच्या घरी आले. किन्नरांना शुभेच्छा देताना डान्स करत कुटूंबांचे मन जिंकले. किन्नरांना अंदाज नव्हता की, इतके मोठे गिफ्ट मिळेल.
नातवाच्या जन्माच्या खुशीत शमशेर यांनी किन्नरांना प्लॉट देण्याबरोबरच अन्य भेटवस्तूहू दिल्या. या प्लॉटटी किंमत जवळपास १५ लाख रुपये सांगितली जात आहे. शमशेर सिंह यांनी प्लॉट देण्याची घोषणा केल्यानंतर किन्नरांनी सांगितले की, या जमीनीवर पशूपालन करून उदरनिर्वाह करतील.
शमशेर यांनी सांगितले की, हा प्लॉट शहरातील झज्जर रोडवरील इंदिरा कॉलनी आणि रामसिंहपुराच्या मध्यभागी आहे. किन्नर सपना गुरु यांनी सांगतिले की, गेल्या २० वर्षापासून आनंदाच्या क्षणी अनेक कुटूंबात जाऊन शुभेच्छा देत असतो मात्र अशी भेट आयुष्यात पहिल्यांदाच मिळाली आहे.
संबंधित बातम्या