Interest Free Loan : ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! ‘या’ राज्यातील सरकारची मोठी घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Interest Free Loan : ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! ‘या’ राज्यातील सरकारची मोठी घोषणा

Interest Free Loan : ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! ‘या’ राज्यातील सरकारची मोठी घोषणा

Published Aug 15, 2024 05:56 PM IST

Interest Free Loan :स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलताना मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी विना व्याज लोनची स्कीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अन्य अनेक मोठ्या घोषणा केल्या

मिझोराममध्ये ५० लाखापर्यंत कर्ज मिळणार विनाव्याज
मिझोराममध्ये ५० लाखापर्यंत कर्ज मिळणार विनाव्याज

देशभरात आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day)उत्साह आहे. या निमित्त मिझोराम सरकारने (Mizoram Govt) एक मोठी घोषणा केली आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा (CM Lalduhoma) यांनी गुरुवारी म्हटले की, राज्य सरकार लोकांच्या आर्थिक उन्नती आणि जीवनमानात सुधार करण्यासाठी ५० लाखापर्यंतचे बिनाव्याज कर्ज देण्याची योजना सुरू करणार आहे.

स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमात घोषणा -
७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी म्हटले की, आमचे सरकार सर्वसमावेशक आहे. त्याचबरोबर राज्याचा विकास व सरकारी योजना पारदर्शीपणे तसेच जबाबदारीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सत्ता मिळाल्यानंतर झोरम पीपुल्स मूव्हमेंट (ZPM) सरकारने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत.

सरकार देणार आर्थिक मदद –

मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सरकार राज्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न करत आहे. याच अनुषगाने सरकार मोठे पाऊल उचलणार असून एक योजना सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी गॅरेंटरचे काम करणार आहे. मिझोराम सरकार गारंटी अधिनियम,२०११ मध्ये सुधारणा करणार आहे. त्यानुसार पात्र लोकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून या योजनेचाही उल्लेख -
स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विना व्याज लोनची स्कीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अन्य अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यानुसार सरकार लवकरच युनिवर्सल हेल्थ केअर स्कीम (Universal Health Care Scheme) सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नवीन व व्यापक हेल्थ सर्विस स्कीममध्ये सामान्य जनतेसोबतच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सही सामील होतील.

राज्यात बाहेरून गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न -
लालदुहोमा यांनी राज्याच्या प्रगतीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाचा उल्लेख करताना म्हटले की, त्यांच्या सरकारने राज्यात अंतर्गत व बाहेरच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी फेब्रवारी मिझोरम Investment Policy 2024 सुरू केली आहे.  त्यांचे सरकार सरकार कृषी उत्पादनाची खेरदी,  फूड प्रोसेसिंग, अग्रीकल्चर आणि स्किल डेवलपमेंटला प्रोत्साहन देण्याबरोबरच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यास प्रयत्नशील आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर