मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UP Viral News : लादेनचा फोटो ऑफिसमध्ये लावणं बेतलं नोकरीवर; सरकारी कर्मचाऱ्याची सेवेतून हकालपट्टी

UP Viral News : लादेनचा फोटो ऑफिसमध्ये लावणं बेतलं नोकरीवर; सरकारी कर्मचाऱ्याची सेवेतून हकालपट्टी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 22, 2023 12:39 PM IST

Osama Bin Laden : जगातील सर्वोत्तम इंजिनियर असल्याचा उल्लेख करत कर्मचाऱ्यानं ऑफिसमध्ये थेट ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Osama Bin Laden Photo In Govt Office
Osama Bin Laden Photo In Govt Office (HT)

Osama Bin Laden Photo In Govt Office : सरकारी कार्यालयात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावणं एका सरकारी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. जगातील सर्वोत्तम इंजिनियर असा उल्लेख करत त्याचा फोटो ऑफिसमध्ये लावणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवेतून नारळ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौत विभागात ही घटना घडली असून रविंद्र गौतम असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी कर्मचारी हा उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागातील एसडीओ पदावर कार्यरत होता. त्याला सेवेतून काढून टाकण्यात आलं असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र गौतम हा उत्तर प्रदेशातील विद्यूत विभागात एडीओ पदावर काम करत होता. त्यावेळी त्यानं त्याच्या कार्यालयात जगातील सर्वोत्तम अभियंता असा उल्लेख करत थेट ओसामा बिन लादेनचा फोटो लावला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस येताच उत्तर प्रदेश सरकारनं गौतम यांना सेवेतून निलंबित करत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. देशातील महापुरुषांचे फोटो सरकारी कार्यालयात अनेकदा लावण्यात येत असतात. परंतु उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यानं थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ओसामा बिन लादेन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी होता. त्यानं अनेक लोकांना मारलेलं होतं. त्याचा फोटो एका कर्मचाऱ्यानं ऑफिसमध्ये लावल्यामुळं आमच्या विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळं आता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज यांनी म्हटलं आहे. रविंद्र गौतम यांनी यापूर्वी अनेकदा उच्च अधिकार्‍यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली होती. याशिवाय त्यांनी लादेनचा फोटो कार्यालयात लावल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याचंही देवराज यांनी म्हटलं आहे.

कोण होता ओसामा बिन लादेन?

ओसाबा बिन लादेन हा कुख्यात दहशतवादी होता. अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या ओसामा बिन लादेन हा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार मानला जातो. याशिवाय मध्य आशियातील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचं यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. अमेरिकन सैन्यानं पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत त्याला ठार मारण्यात आलं होतं.

IPL_Entry_Point