मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द, केंद्र सरकारची कारवाई

राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द, केंद्र सरकारची कारवाई

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 23, 2022 10:41 AM IST

Rajiv Gandhi Foundation: सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द करण्यात आला असून यामुळे आता फाउंडेशनला परदेशातून निधी मिळणार नाही.

राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द, केंद्राची कारवाई
राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द, केंद्राची कारवाई

Rajiv Gandhi Foundation: केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. सोनिया गांधी या अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनला यामुळे आता परदेशातून निधी मिळणार ननाही. तसंच आतापर्यंत जे पैसे मिळाले आहेत त्याचीही चौकशी होईल. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

राजीव गांधी फाउंडेशनवर पहिल्यांदा २०२० मध्ये आरोप करण्यात आले होते. या फाउंडेशनला चीनमधून ९० लाख रुपये मिळाल्याचं म्हटलं होतं. कायद्यातील नियमांचे उल्लंघन करत हा निधी मिळाल्याचं म्हणत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली होती. अखेर एफसीआरएने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला.

IPL_Entry_Point