Surrogacy Leave : सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Surrogacy Leave : सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

Surrogacy Leave : सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

Jun 24, 2024 07:22 PM IST

Surrogacy Leave: केंद्र सरकारने आपल्या ५० वर्षापूर्वीच्या नियमात बदल करत आता सरोगरीच्या माध्यमातून आई बनलेल्या महिलेलाही ६ महिन्यांची मातृत्व रजा देण्याची तरतूद केली आहे.

सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा
सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

maternity leave for surrogacy mother : केंद्र सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारी महिला कर्मचारी सरोगसीपासून (भाड्याने गर्भाशय घेऊन) आई बनल्यानंतरही सहा महिन्यांची मातृत्व रजा घेऊ शकणार आहे. केंद्र सरकारने याबाबत आपल्या ५० वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल केला आहे. सरोगसी म्हणजे दुसऱ्याच्या गर्भशयात मूल वाढून मुलाला जन्म देणे. केंद्रीय सिविल सेवा (रजा) नियमावली, १९७२ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार आई (सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या मुलांचे संगोपण करणारी आई) मुलाच्या संगोपणासाठी मातृत्व रजा घेऊ शकते. त्याचबरोबर वडील १५ दिवसांची पितृत्व रजाही घेऊ शकतो.

मनुष्यबळ विकास मंत्रालय द्वारे अधिसूचित संशोधित नियमात म्हटले आहे की, सरोगसीच्या (surrogacy mother)  परिस्थितीत सरोगेट महिलेसोबत अधिष्ठाता आईला जिचे दोन पेक्षा कमी मुले आहेत, अथवा दोघे सरकारी सेवेत असल्यास १८० दिवसांची मातृत्व रजा दिली जाऊ शकते. आतापर्यंत सरोगसीच्या माध्यमातून मुलाचा जन्म झाल्यास सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा देण्याची कोणतीही तरतूद नव्हती.

नव्या नियमात म्हटले आहे की, सरोगसीच्या माध्यमातून मूल झाल्यानंतर अधिष्ठाता पिता, जो सरकारी सेवक आहे, ज्याचे दोन पेक्षा कमी हयात मुले आहेत. त्याला मुलाच्या जन्माच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाऊ शकते. हा नियम १८ जून रोजी मंजूर केला होता. यामध्ये म्हटले होते की, सरोगसीच्या स्थितीत अधिष्ठाता आई, जिचे दोन हून कमी मुले आहेत, तिला शिशु संगोपणासाठी रजा दिली जाऊ शकते.

सध्याच्या नियमानुसार एखाद्या महिला सरकारी कर्मचारी आणि एकल पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मुलांच्या संगोपणासाठी डसे शिक्षण, आजारपण आणि या प्रकरच्या अन्य गरजांसाठी पूर्ण सेवाकाळात कमाल ७३० दिवसांची शिशु संगोपण रजा (चाइल्ड केअर लीव) दिली जाऊ शकते.

सरोगसी म्हणजे काय?

सध्या सरोगसी शब्द नेहमी कानावर पडत असतो. अनेक जोडप्यांनी सरोगसीच्या माध्यमातून संतानसुख मिळवले आहे. मात्र अनेकांना माहीत नसते की, सरोगरी म्हणजे नेमकं काय. तर सोप्या शब्दात सांगायचं तर सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं आपले अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूळ होऊ शकते. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही दाम्पत्य मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर