Rajasthan News: राजस्थानमधील अलवर येथे पत्नीच्या रील बनवण्याच्या नादाने त्रस्त एका पतीने आत्महत्या केली आहे. पतीने अनेक वेळा पत्नीला रील बनवण्यापासून रोखले होते, मात्र तिने त्याचे ऐकले नाही. यावरून दोघांमघ्ये वाद वाढत गेला व पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. यावरून घरातही वाद होऊ लागला. याला कंटाळून पतीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सोशल मीडियावर लाइव येत अश्लील कमेंट करणाऱ्या लोकांना सुनावले तसेच कुटूंबात सुरू असलेल्या वादाचीही माहिती दिली.
सिद्धार्थ दौसा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा सरकारी कर्मचारी रैनी परिसरातील नांगलबास गावात राहत होता. सिद्धार्थ दौसा आरोग्य विभागात एलडीसी (अवर श्रेणी लिपिक) पदावर कार्यरत होता. दीड वर्षापूर्वीच वडिलांच्या जागी त्याची अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव माया असे आहे. ५ एप्रिल रोजी सिद्धार्थने आत्महत्या केली व ६ एप्रिल रोजी कुटूंबीयांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली.
सिद्धार्थच्या पत्नीला रील्स बनवण्याची आवड होती. मात्र सिद्धार्थला त्याच्या पत्नीचे रील्स बनवणे खटकत होते. त्याने तिला रील बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून दोघांमध्ये सतत वाद होता होता. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीच्या रील्सवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले.
मायाला सोशल मीडियावर रील बनवण्याचा नाद होता. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती रील पोस्ट करत होती. त्यावर लोक अश्लील कमेंट करत होते. पत्नीच्या रीलवर लोकांचे अश्लील कमेंट सिद्धार्थला बिल्कुल आवडत नव्हते. यावरूनच दोघांत वाद होऊ लागला. सिद्धार्थ आणि मायाला तीन मुली व एक मुलगा आहे.
माहेरी गेलेल्या मायाने सिद्धार्थवर आरोप करत त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, सिद्धार्थला दारूचे व्यसन असून या कारणामुळेच दोघांत वाद होत आहे.
मायाचे इन्स्टाग्रामवर ५६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच रील बनवण्यात व्यस्त असायची. काही लोक तिच्या पोस्टवर अश्लिल कमेंट करायचे. पत्नीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर येणाऱ्या अश्लिल कमेंट्समुळे सिद्धार्थ नाराज होता. आत्महत्येपूर्वी लाइव्ह येत सिद्धार्थने अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना म्हटले होते की, 'जेव्हा हे तुमच्या घरात होईल तेव्हाच तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटू देणार नाही. म्हणूनच मी माझा जीव देत आहे. तसेच सिद्धार्थ म्हणाला की, ती हा व्हिडिओ पाहात असेल तर नीट ऐक, तू घटस्फोट घे. चारी मुले माझ्याकडे राहतील. रतिराम कोण आहे. मी तुझा पती आहे. मी जे म्हणेण तसेच होईल. मी लाईव्ह येत सांगत आहे मी आज मरत आहे.