Google Chorme News : गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्ससाठी भारत सरकारशी संबंधित कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) या एजन्सीने मोठा इशारा दिला आहे. जर तुम्ही गुगल क्रोम इंटरनेट ब्राउजर वापरत असाल तर तुम्हाला काजळी व सतर्क राहावे लागणार आहे. विशेषत: विंडोज किंवा मॅकओएसवर गूगल क्रोम ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.
सीईआरटी-इनने आपल्या बुलेटिनमध्ये गुगल क्रोम वापरकर्त्यांनी कोणत्या डिव्हाइसेसपासून सावध राहण्याची गरज आहे आणि कोणत्या त्रुटींमुळे क्रोम वापरण्यास धोका होय शकतो या बाबत इशारा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने एक्सटेंशन एपीआय लागू केल्याने आणि फ्री इन स्किया, व्ही ८ वापरल्यामुळे गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. सायबर हल्लेखोर व घोटाळेबाज या क्रोममधील त्रुटींचा फायदा घेऊ शकतात.
क्रोम ब्राउझरमधील महत्वाच्या कंपोनंटमध्ये ही त्रुटी आढळली आहे. यामुळे युजर्सचे मोठे नुकसान होऊ शकते. एजन्सीने म्हटले आहे की, या त्रुटींमुळे सायबर गुन्हेगार हे दूरवरून वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकतात. या द्वारे युझर्सचे डिव्हाइस हॅक करू शकतात. त्यांना डिव्हाईसच्या फिजिकल अॅक्सेसची देखील आवश्यकता भासणार नाही. या द्वारे ते त्यांना हवी ती माहिती चोरू शकतात. तसेच मोठा आर्थिक घोटाला देखील करू शकतात.
सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर तुमच्या डिव्हाइसला हात न लावता खास डिझाइन केलेल्या वेबपेजच्या माध्यमातून सायबर चोरटे तुमच्या कम्प्युटरचा ताबा घेऊ शकतात. यानंतर तुमचा वैयक्तिक डेटा चोरण्यापासून ते ओळख चोरण्यापर्यंत व इतर घोटाळे करत तुमचे खाते तुमच्या नकळत रिकामे केले जाऊ शकते.
लेटेस्ट व्हर्जनमध्ये ब्राउझर आपोआप अपडेट होत असला तरी तुम्ही अद्याप क्रोम अपडेट केले नसेल तर लगेच करावे. जर तुमच्या ब्राउझरला अपडेट मिळाले नाही तर तुम्हाला फिक्सची वाट पाहावी लागेल. लिनक्सवरील १३३.०.६९४३.५३ पेक्षा जुन्या क्रोम आवृत्त्या आणि विंडो किंवा मॅकवरील १३३.०.६९४३.५३/५४ पेक्षा जुन्या क्रोम आवृत्त्या या जोखमीच्या श्रेणीत येतात, असे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या