घृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक-goons urinated on the face of dalit youth after beating him in sonbhadra up ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक

घृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक

Oct 02, 2024 09:01 PM IST

उत्तरप्रदेशमधील सोनभद्रमधून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे एका दलित तरुणाला काही तरुणांनी मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर लघुशंका केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दलित तरुणाला मारहाण करून अंगावर केली लघुशंका
दलित तरुणाला मारहाण करून अंगावर केली लघुशंका

माणुसकीला लाजवणारी एक घटना यूपीतील सोनभद्रमधून समोर आली आहे. जिथे एका दलित तरुणाला मारहाण करून अमानुष वागणूक देण्यात आली. त्याला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या शरीरावर व तोंडावर लघुशंका करण्याचे किळसवाणे कृत्य केले आहे.   या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत त्यातील  एका आरोपीला अटक केली.

ही घटना शक्तीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिलकडड येथील आहे. अप्पर पोलिस अधीक्षक कालू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पवन खरवार याला बॅरियर क्रमांक एकजवळ अंकित भारती व इतर सात ते आठ तरुणांनी घेरले आणि मारहाण केली. यानंतर एका तरुणाने पवन खरवार यांच्यावर लघवी केली. तर इतर तरुणांनी उभे राहून त्याचा व्हिडिओ बनवला. तो बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.  सात ते आठ तरुणांनी पवनला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी केल्याची घटना या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, पवनच्या शर्टची कॉलर त्याच्या गळ्याजवळ रक्ताने माखलेली आहे व  तो जखमी अवस्थेत जमिनीवर बसला आहे.  त्याचवेळी एक हाफ पँट घातलेला तरुण त्याच्या अंगावर लघवी करत आहे आणि काही लोक पवनलाला शिवीगाळ करताना व्हिडिओही बनवत आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या व्हिडिओचा तपास केला जात आहे. अपर पोलीस अधीक्षक कालू सिंह यांनी सांगितले की, घटनेनंतर जखमी पवन खरवार आपला भाऊ शिवकुमार खरवार याच्यासोबत मध्य प्रदेशातील बैधान येथे गेला होता. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज जेव्हा तो शक्तीनगरला परत आला तेव्हा पीडितेचा भाऊ शिवकुमार खरवार याने ट्विट करून पोलीस अधिकारी, पीएमओ आणि मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. शिवकुमार खरवार आणि त्याचा पीडित भाऊ पवन खरवार यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी मुख्य आरोपी अंकित भारतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले. हे प्रकरण अमानुष कृत्यांचे असल्याने कडक कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग