मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lakshadweep: गुगल सर्चमध्येही लक्षद्वीपने २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला; मोदींच्या दौऱ्याने पार चित्रच पालटले

Lakshadweep: गुगल सर्चमध्येही लक्षद्वीपने २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला; मोदींच्या दौऱ्याने पार चित्रच पालटले

Jan 08, 2024 06:48 PM IST

Lakshadweep in Googal Search on Top : लक्षद्वीपने गुगल सर्चमध्ये २० वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. मालदीवमध्येही लक्षद्वीप सर्च केलं जातंय. त्यामुळेच अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपला तिकीट बुक करणे सुरू केल्याचं दिसत आहे.

Lakshadweep in Googal Search on Top
Lakshadweep in Googal Search on Top

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर 'लक्षद्वीप कीवर्ड' ने गूगल सर्चमध्ये २० वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. २० वर्षापूर्वी पहिल्यांदा असे झाले होते, जेव्हा गूगलवर संपूर्ण जगातून लक्षद्वीप सर्च केले जात होते. पंतप्रधान मोदींनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला होता व आपले काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून इतकं गूगल सर्च केलं नसतं. मात्र या प्रकरणात  मालदीवच्या मंत्र्यांसोबत सरकारी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत मोदी व भारतावर आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने लोकांमध्ये लक्षद्वीप प्रति प्रेम तर मालदीव विषयी द्वेष निर्माण केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यांवरून मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांनी अपमानजनक व आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर मालदीव बॉयकॉट ट्रेंड करू लागले होते. 

मोदींच्या या ट्रीपनंतर गूगलवर लोक अंदमान आणि निकोबार बेटाची लोकसंख्या, संस्कृती,  आणि होटेल्सबाबतही सर्च करत आहेत. गूगलवर लक्षद्वीपविषयी प्रतिदिन १,००,००० हून अधिक सर्च होत आहेत. 

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या ट्विटनंतर सुरू झालेल्या वादानंतर हजारो लोकांनी आपली मालदीव ट्रिप रद्द केली आहे. अनेक बुकिंग साइट कॅन्सल होत असलेल्या बुकिंगने त्रस्त आहेत.

आता लक्षद्वीप हे गुगलवर सर्वाधिक ट्रेंडिंग डेस्टिनेशन ठरले आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीप गेल्या महिन्यात सर्चमध्ये मालदीवपेक्षा फार मागे होतं. मालदीवमध्येही लक्षद्वीप सर्च केलं जातंय. त्यामुळेच अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपला तिकीट बुक करणे सुरू केल्याचं चित्रही निर्माण झालं आहे.

WhatsApp channel
विभाग