Google Latest News: गूगल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गूगल येत्या १५ मे पासून त्याच्या सर्व वापरकर्त्यांसाठी मॅजिक एडिटर आणि मॅजिक इरेझरसह एआय पावर्ड एडिटिंग टूल्सचा विस्तार करत आहे.जगभरात मोठ्या संख्येत लोक एआय एडिटिंग टूल्सचा वापर करत असल्याने गूगलने हे पाऊल उचलले आहे.
या फीचरद्वारे गूगलच्या वापरकर्त्यांना कोणत्याही फोटोचा विशिष्ट भाग एडीट करता येणार आहे.वस्तूंची पुनर्रचना करणे, आकाशाचा रंग किंवा फोटो बॅकग्राउंड बदलणे इत्यादी गोष्टी या फीचरमुळे करता येणार आहे. हे फीचर सर्वात प्रथम २०२३ मध्ये Google I/O सादर करण्यात आले होते. सध्या हे फीचर्स गूगल पिक्सल ८ आणि गूगल पिक्सल ८ प्रो स्मार्टफोनमध्ये मिळत आहेत. परंतु, गूगलने दिलेल्या माहितीनुसार, मॅजिक एडिटर सर्व पिक्सेल स्मार्टफोनसाठी उपलब्ध असेल.
Android आणि iOS वर सर्व गूगल फोटो वापरकर्त्यांना दरमहा १० मॅजिक एडिटर सेव्ह देखील मिळतील. या मर्यादेच्या पलीकडे वापरकर्त्यांना प्रीमियम गूगल वन प्लान खरेदी करावा लागेल. हे फीचर्स किमान 3 जीबी रॅम असलेल्या आणि Android 8.0/IOS 15 किंवा नंतरच्या सॉफ्टवेअर आवृत्तीवर चालणाऱ्या डिव्हाइसवर उपलब्ध असेल. हे फीचर पिक्सेल टॅबलेट वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध असेल, अशी माहिती गूगलने दिली.
मॅजिक इरेजर वापरकर्त्यांना त्यांच्या फोटोंमधून लक्ष विचलित करणारी वस्तू काढून टाकण्याची परवानगी देते. जसे की बॅकग्राऊंडमधील लोक आणि वीजेचा खांब. हे फीचर ऑक्टोबर २०२१ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले. हे फीचर फेब्रुवारी २०२३ मध्ये Android आणि iOS वर सर्व पिक्सल स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आणि गूगल वनच्या सदस्यांसाठी आणले गेले.
एआय एडिटिंग फीचरचा अस्पष्ट फोटो साफ करण्यासाठी वापर केला जातो. फोटो अनब्लर करणे, पोट्रेट फोटोमधील प्रकाशाची स्थिती आणि ब्राइटनेस एडजस्ट करते. तसेच फोटो आणि व्हिडिओसाठी एचडीआर इफेक्ट, कलर पॉप आणि पर्सनलाइज्ड करण्यासाठी या फीचरचा उपयोग होतो.
सिनेमॅटिक फोटो, पोर्ट्रेट ब्लर, स्काय सजेशन आणि व्हिडीओ इफेक्ट्स सारखी फीचर्सही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गूगलने म्हटले आहे की, ही फीचर्स १५ मे पासून ग्राहकांसाठी रोल आउट होण्यास सुरू होतील.
संबंधित बातम्या