Google news : बालपणीच्या फोटोला पॉर्न म्हणत गुगलनं केलं युजरचं अकाऊंट ब्लॉक, हायकोर्टानं पाठवली नोटीस
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google news : बालपणीच्या फोटोला पॉर्न म्हणत गुगलनं केलं युजरचं अकाऊंट ब्लॉक, हायकोर्टानं पाठवली नोटीस

Google news : बालपणीच्या फोटोला पॉर्न म्हणत गुगलनं केलं युजरचं अकाऊंट ब्लॉक, हायकोर्टानं पाठवली नोटीस

Updated Mar 18, 2024 02:34 PM IST

HC notice to Google: वापरकर्त्याचे अकाऊंट ब्लॉक केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने गूगलला नोटीस पाठवले असून येत्या २६ मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे.

Google News
Google News

Google News: गुजरात उच्च न्यायालयाने एका आगळ्यावेगळ्या प्रकरणात गूगलला नोटीस बजावली. गूगलच्या एका वापरकर्त्याने त्याचा बालपणीचा फोटो ड्राइव्हवर अपलोड केला. मात्र, त्यानंतर गूगलने या फोटोला चाइल्ड पॉर्न म्हणत वापरकर्त्यांचे अकाऊंट ब्लॉक केले. हे लक्षात येताच वापरकरत्याने गूगलविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने गूगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसह राज्य आणि केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे.

नील शुक्ला (वय, २४) असे वापरकर्त्याचे नाव आहे. अभियंता नील शुक्ला यांनी सांगितले की, त्याने गूगल ड्राईव्हवर त्याचा बालपणीचा फोटो अपलोड केला. या फोटोमध्ये त्याची आजी त्याला अंघोळ घालताना दिसत आहे. मात्र, या फोटोला गूगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने चाइल्ड पॉर्न म्हटले आणि वापरकर्त्याचे अकाऊंट ब्लॉक केले.

नील म्हणाला की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने गूगल ड्राइव्हवर त्याचे फोटो अपलोड केले. मात्र, त्यानंतर त्याचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले. अकाऊंट ब्लॉक केल्यामुळे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तसेच त्याचे व्यवसायिक नुकसानदेखील झाले. नीलने त्याचे अकाऊंट पुन्हा सक्रीय करण्यासाठी गूगलशी संपर्क साधला. पण गूगलकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

नीलला गुगलकडून नुकतीच नोटीस मिळाली आहे की, त्याच्या खात्याशी संबंधित डेटा एप्रिलमध्ये हटवला जाईल. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती व्हीडी नानावटी यांनी गूगलला नोटीस बजावली आणि २६ मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे.

नीलने सांगितले की, गुगलने आंघोळीचा फोटो चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणत त्याचे अकाऊंट ब्लॉक केले होते, त्यानंतर त्याने त्याच्या इतर अकाउंटवरून काम करण्याचा प्रयत्न केला. पण जॉइंट व्हेरिफिकेशनमुळे तो आयडीही ब्लॉक करण्यात आला. अनेकवेळा तक्रारी करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यानंतर गुजरात पोलीस आणि नोडल एजन्सी असलेल्या केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी त्याने संपर्क साधला. परंतु, त्याच्या तक्रारीचे निवारण करण्यात न आल्याने त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर