google flights tool : जर तुम्ही प्रवासाची योजना आखत असाल आणि स्वस्त विमान टिकीटांसाठी प्रयत्न करणार असाल तर आता तुमच्यासाठी Google Flights हे एक अतिशय उपयुक्त माध्यम आहे. या टूलच्या मदतीने प्रवाशांना सर्वोत्तम आणि कमी दारातील फ्लाइट शोधणे सोपे होणार आहे. Google Flights किंमत, कालावधी आणि वेळ लक्षात घेऊन सर्वोत्तम फ्लाइटचा पर्याय ग्राहकांना देणार आहे. प्रवाशांचा फ्लाइट तिकीट बुकिंग अनुभव सुधारण्यासाठी अनेक टूल्स या फीचरमध्ये देण्यात आली आहे. यात विमानाच्या तिकिटाचा किंमत आलेख आणि निवडलेल्या मार्गासाठी सध्याची किंमत पूर्वीचे आदि बाबी प्रवाशांना या माध्यमांतून तपासता येणार आहेत.
विमानाचा सारखा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गूगलचे हे नवे फीचर उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे ते आधीचया महिन्यांचा आणि आठवड्यांचा किमतीचा कल पाहू शकणार आहेत. यामध्ये प्रवाशांना अॅक्टिव्हेटेड फ्लाइट आणि प्राइस ट्रॅकिंगची सुविधाही देण्यात आली आहे. जेव्हा एखाद्याला तिकीट बुक करण्यासाठी सर्वोत्तम किंमत हवी असेल तेव्हा तेव्हा किंमत ट्रॅकिंग फीचर उपयोगी पडेल. तिकिटाच्या किमतीत मोठी घट झाल्यावर हे फीचर वापरकर्त्याला याची माहितीही देणार आहे.
जर भविष्यात प्रवासाचे नियोजन असल्यास, संबंधित तारखेला वापरकर्ते तिकीट दर ट्रॅकिंग चालू करू शकणार आहेत. चांगल्या दारांसाठी किंमत ट्रॅकिंगचा कोणताही तारीख पर्याय निवडणे महत्त्वाचे राहणार आहे. यामध्ये ३ ते ६ महिन्यांसाठी सर्वोत्तम डीलचे अलर्ट वापरकर्त्यांना मिळत राहतील. या ट्रॅकिंग वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी, Google खात्यावर लॉग इन करावे लागणार आहे.
चांगले तिकीट दर शोधण्याचा अनुभव सुधारण्यासाठी, Google Flights ने दिलेल्या विविध टूल्समध्ये अनेक फिल्टर देखील देण्यात आले आहेत. हे फिल्टर उत्तम तिकीट शोधासाठी विमानाच्या थांब्यांची संख्या, वेळ, प्राधान्यकृत विमानसेवा, सामान भत्ता, कनेक्टिंग विमानतळ आणि एकूण कालावधी या सारखे पर्याय देतात. या सर्व टूल्स आणि वैशिष्ट्यांच्या मदतीने वापरकर्ते प्रवासासाठी चांगला आणि माफक दारातील सर्वोत्तम फ्लाइट डील आता मिळवू शकणार आहेत.