google cost cutting : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमधील कॉस्ट कटींगचा खेळ सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नोकऱ्या कपातीच्या बातम्या येत आहेत. आता गुगलने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली मोठा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या संपूर्ण पायथन टीमला काढून टाकले आहे. असे सांगितले जात आहे की कंपनी अमेरिकेबाहेर स्वस्त कर्मचारी नियुक्त करून पायथन व्यवसाय चालवण्याचा विचार करत आहे. या विषयावर बोलताना, गुगलने टेक क्रंचला सांगितले की, हा निर्णय कंपनीच्या संघटनात्मक पुनर्रचनेचा एक भाग आहे. गुगलने पुढे सांगितले की, कंपनीने पायथनमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यामध्ये सामील होण्याची ऑफर देखील दिली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या अहवालानुसार, गुगलने जर्मनीतील म्युनिकमध्ये एक नवीन टीम तयार केली आहे. यात कमी पगारात नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. पायथनमध्ये हे कर्मचारी एक्स्पर्ट असून गूगल त्यांच्या प्रतिभे पेक्षा कमी पगार त्यांना देणार आहे. पायथनमध्ये उत्कृष्ठ असणाऱ्याचा हा अभियंत्यांचा एक गट आहे जो वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग भाषेच्या मागण्या आणि समस्या हाताळत असतो. या नव्या बदलांमुळे गुगल किती बचत करेल हे या अहवालात सांगितलेले नाही.
गुगलने असेही म्हटले आहे की ते काढून टाकलेल्या टीमला भरपाई देण्याचा विचार करत आहे. गुगलने पुढे सांगितले की, गुगल आणि काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा आहे. गूगलच्या मते, काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घेण्याचा मानस आहे. भविष्यात नोकरीच्या संभाव्यतेकडे देखील कंपनी लक्ष देणार आहे. या वर्षी आम्ही गूगलमध्ये टाळेबंदीच्या नावाखाली अनेकवेळा कर्मचारी कपात करण्यात आली आहे. या मुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
संबंधित बातम्या