Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

May 03, 2024 12:05 PM IST

Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी काळजी करण्याची बातमी आहे. खुद्द भारत सरकारने याबाबतचा इशारा दिला आहे. या धोक्यापासून सुरक्षित कसे राहायचे या बाबत भारत सरकारने काही सूचना केल्या आहेत.

गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्स धोक्यात; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण
गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्स धोक्यात; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण

Google Chrome security issue : गुगल क्रोम वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. क्रोमवापरणाऱ्या वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. खुद्द भारत सरकारने याबाबतचा इशारा दिला आहे. वास्तविक, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने Google Chrome वेब ब्राउझरच्या काही व्हरजनमध्ये आढळलेल्या सुरक्षा त्रुटींबाबत चेतावणी दिली आहे. या त्रुटीकहा फायदा घेऊन हॅकर्स व्हायरस द्वारे वापरकर्त्यांची संवेदनशील माहितीची चोरी करण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

raebareli : राहुल गांधी यांना काँग्रेसनं रायबरेलीतून का उतरवलं? काय आहे यामागचं राजकीय गणित?

वैयक्तिक व आर्थिक माहितीची चोरी होण्याची शक्यता

लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि आर्थिक तपशीलांसह सिस्टमवर संचयित केलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये या प्रवेश मिळविण्यासाठी हॅकर्स या वेब ब्राउझरच्या काही व्हरजनमध्ये असलेल्या असुरक्षिततेचा फायदा घेऊ शकतात.

गूगल क्रोमच्या कोणत्या वेब ब्राउझरसाठी आहे धोका

Windows आणि Mac साठी 124.0.6367.78/.79 पूर्वीचे Google Chrome चे व्हरजन, Linux साठी 124.0.6367.78 पूर्वीचे Google Chrome च्या व्हरजनमध्ये असणाऱ्या त्रुटींचा फायदा हॅकर्स कुठूनही घेऊ शकतात. या त्रुटी ANGLE मध्ये टाईप गोंधळ, V8 API मध्ये असणाऱ्या मर्यादांचा फायदा हॅकर कोठूनही घेऊ शकतात. हॅकर दूर राहून वापर कर्त्यांना रिक्वेस्ट पाठवून या ब्राउझरमध्ये असलेल्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन यूझर्सचे अकाऊंट देखील हॅक करू शकतात. या त्रुटीचा फायदा हॅकर कोठूनही घेऊन सेवा नाकारण्याची (DoS) परिस्थिती निर्माण करून लक्ष्य प्रणालीवर अनियंत्रित कोड कार्यान्वित करू शकतात.

sushma andhare : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थोडक्यात बचावल्या

सुरक्षित राहण्यासाठी हे काम त्वरित करा

CERT-In ने क्रोम वापरकर्त्यांना गूगल क्रोमचे उपडेटेड व्हरजन डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. वापरकर्त्यांनी हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की जेव्हाही संबंधित कंपन्यांद्वारे नवीन सुरक्षा पॅच जारी केले जातात तेव्हा त्यांनी त्यांचे ब्राउझर अपडेट करणे महत्वाचे आहे.

सामान्यतः, Google Chrome सहसा आपोआप अपडेट होत असतं आणि पूर्ण झाल्यावर वापरकर्त्यांना ब्राउझर पुन्हा नव्याने वापरण्याच्या सूचना देखील दिल्या जातात. पान हे ब्राउझर मॅन्युअली देखील अपडेट केले जाऊ शकते.

ब्राउझर अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

- Google Chrome ओपन करा.

- ड्रॉप-डाउन मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी वरच्या-उजव्या कोपऱ्यातील उभ्या बिंदूंवर क्लिक करा.

- मेनूमधून 'मदत' हेल्प हा पर्याय निवडा.

- - सबमेनूमधून 'Google Chrome बद्दल' निवडा.

- आता Google Chrome स्वयंचलितपणे आलेले उपदेत तपासेल आणि उपलब्ध उपडेट प्रक्रिया सुरू करेल.

- अपडेट पूर्ण झाल्यावर, क्रोमचे नवे व्हरजन वापरण्यासाठी Google Chrome बंद करून पुन्हा सुरू करा.

तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल क्रोम वापरत असाल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन गुगल क्रोम अपडेट करू शकता.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर