मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google app Ban : 'हे' ॲप्स फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा...

Google app Ban : 'हे' ॲप्स फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा...

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 02, 2023 08:21 AM IST

Google app Ban : नागरिकांना चांगल्या परताव्याचे आश्वासन देऊन पर्सनल लोन देण्याच्या बण्याने खाती रिकामी करणाऱ्या ॲप्सवर गूगलने मोठी कारवाई केली आहे.

Google India
Google India

नवी दिल्ली : नागरिकांना चांगल्या परताव्याचे आश्वासन देऊन पर्सनल लोन देण्याच्या बण्याने खाती रिकामी करणाऱ्या ॲप्सवर गूगलने मोठी कारवाई केली आहे. या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. जर ही ॲप्स तुमच्या खात्यात असतील तर तातडीने डिलीत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Agni-1 Missile : चीन, पाकिस्तानला भरणार धडकी; DRDO नं केले अग्नी १ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

गुगल स्टोअरवर पर्सनल लोन देणारी ॲप्स आहेत. ही ॲप्स मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केली जातात. दरम्यान, कमी व्याजदर आणि अनेक प्रलोभने दाखवून नागरिकांना पर्सनल लोन ही ॲप्सदेत होते. दरम्यान, हे ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर नागरिकांची खाती रिकामी होत होती. यामुळे अशा ॲप्सवर गुगलने कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. गुगलने पर्सनल कर्ज देणाऱ्या या ॲप्ससंबधी नियमांमध्ये बदल केला असून अशा ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

या ॲप्सवर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरून ती वैयक्तिक माहिती चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी वापरली जात होती. त्यामुळे गूगल स्टोअरवर असणारी अशी तब्बल २ हजार ॲप्स काढून टाकण्यात आली आहेत. देशात ॲप्सद्वारे वैयक्तिक कर्ज देण्यावर बंदी आहे. फक्त मान्यताप्राप्त आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे परवाने असलेले ॲप्सला या प्रकारंचे पर्सनल लोन देण्याचे अधिकार आहेट. मात्र, अनेक बोगस ॲप्स गूगलवर असल्याने आरबीआयने गूगलला या बाबत माहिती मागितली होती. यावर माहिती देतांना तब्बल २००० ॲप्सने प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने काढून टाकल्याचे सांगण्यात आले. पुन्हा या प्रकारे ॲप्स आढळल्यास आणखी कारवाई केली जाईल, असेही गुगलने सांगितले आहे.

 

दरम्यान, नागरिकांनी पर्सनल लोनसंबधी असे ॲप्स डाउनलोड करू नयेत. तसंच अधिकृत बँक सोडून कुठूनही कर्ज घेण्यासाठी कोणतेही ॲप्स वापरूनये. जर अशी ॲप्स असतील तर ती लगेच काढून टाकण्याचे आवाहन गुगलने केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग