AI answer on kidney stone : जगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सांगणकाच्या आणि इंटरनेटच्या युगात आता एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्चस्व आहे. या एआयने अनेकांची कामे सोपी केली आहे. अनेक ॲप्स आणि सॉफ्टवेअरद्वारे, लोक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटोंपासून कंटेंटपर्यंत आयत्या गोष्टी तयार करत आहे. या सर्वांसाठी एआयची मदत घेतली जाते. मात्र, एकाने गूगल एआयला असे काही विचारले की मिळालेल्या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गुगलच्या सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्समध्येही ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने किडनी स्टोन झाल्यास काय करावे या बाबत गूगल एआयद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जे उत्तर गूगलने दिले यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. तंत्रज्ञानाच्या जगात या उत्तराने गुगलचीही बदनामी होत आहे.
गूगलवर सर्च करण्यात आलेल्या या उत्तरात किडनी स्टोन दूर करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करा असे म्हटले होते. यात पाणी, आल्याचे पाणी, लिंबाचा रस, फळांचा रस आदि फळांची आणि पदार्थांची नावे सांगण्यात आली. हे पदार्थ मुतखड्यासाठी प्रभावी असल्याचे गूगल एआयने म्हटले होते. याशिवाय, तुम्ही दिवसभरात सुमारे दोन लिटर लघवी पिळयास याचा प्रभावी परिमाण होतो असे देखील उत्तर गूगल एआयने दिले. लघवी पिण्याच्या या विचित्र सल्ल्यासाठी लोक गुगलला ट्रोल करत आहे. गुगल सर्चमध्ये सापडलेली ही विचित्र माहिती एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यावर अनेक कमेंट येत असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे गुगलची चिंता वाढली आहे.
या बाबत गूगल बाबत एक्स्पर्ट असलेले माईक किंग म्हणाले, गूगलने मी आदाराने म्हणेन की हे प्रॉडक्ट चांगले उत्पादन नाही. एका यूजरने लिहिले की, 'आम्ही जवळपास अर्ध्या शतकापासून कॉम्प्युटर आणि डेटा सायन्सचा अभ्यास करत आहोत. आता आम्ही हे काम एआय मार्केटिंगकडे सोपवले जात आहे. गुगल एआयने दिलेल्या विचित्र सर्च रिझल्टनंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनी गुगलवर या बाबत सर्च केले असून त्यांना देखील हीच माहिती मिळाली. याआधीही गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेमिनीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नाही. अनेक लोकांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्यावर गुगलने त्यात काही सुधारणा केल्या आहेत.
किडनी स्टोन काढण्यासाठी काय उपाय करायला हवे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ते आता जाणून घेऊया. गूगलने या बाबत बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही जास्त पाणी प्यावे. दिवसातून किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. जास्त मेहनतीचे काम केल्यावर तसेच उष्ण हवामानात पाणी पिणे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करा. लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा. यानंतरही आराम न मिळाल्यास एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे देखील गूगलने म्हटले आहे.