Good train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Good train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी

Good train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी

Published Oct 04, 2024 07:22 AM IST

Good train derails on Delhi-Mumbai route: दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून खाली घसरल्याची घटना उघडकीस आली.

 दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर मालगाडीला अपघात
दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर मालगाडीला अपघात

Good train derails In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रतलाममध्ये मालगाडीला भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र या अपघाताचा परिणाम डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर गुरुवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला. नागदा रेल्वे मार्गावर डिझेलने भरलेल्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. रतलाममधील घाटला पुलाजवळ ही घटना घडली आहे. य घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रेस्क्यू टीम काम करत आहे. ही मालगाडी गुजरातमधील राजकोट येथून भोपाळजवळील बकानिया-भोरी येथे पेट्रोलियम पदार्थ घेऊन जात होती. यामुळे मालगाडीजवळ बिडी, सिगारेट ओढू नये आणि मालगाडीपासून दूर रहावे, असा इशारा रेल्वेच्या अधिकऱ्यांनी दिला आहे.

रतलाम रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर यार्डच्या दिशेने हा अपघात झाला. मालगाडीचे डबे रुळावर आणण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि पथके प्रयत्न करत आहेत. अपघात निवारण गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेमुळे डाऊन लाईनवर परिणाम झाला आहे, माहिती समोर येत आहे.

रतलामचे डीआरएम रजनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. एक डबा उचलण्यात आला आहे. तर, उर्वरीत दोन डबे उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अपघातामुळे काही गाड्यांन उशीर होऊ शकतो. परंतु, आम्ही कोणत्याही गाड्या रद्द करण्यात आल्या नाही. याप्रकरणी तपास केला जात आहे. तसेच एका डब्यातून ज्वलनशील पदार्थाची गळती होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.'

मध्य प्रदेशात बस- ट्रकच्या धडकेत ९ ठार, २४ जखमी

मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३० वर शनिवारी रात्री बस आणि हायवा ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. दहा पैकी पाच जण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीची स्लीपर कोच बस शनिवारी (२९ सप्टेंबर २०२४) रात्री प्रयागराजहून नागपूरकडे जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हायवा ट्रकच्या चालकाने ट्रकचा वेग अचानक कमी केला आणि तो रस्त्यावरच थांबवला. परंतु, पाठीमागून येणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दगड वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकली.

सतनाचे पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी सांगितले की, भीषण धडकेमुळे बस ट्रकमध्ये अडकली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि कटरचा वापर केला जात आहे. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २८ जणांना सतना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. तर दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात ट्रक आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १० प्रवाशांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असून मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर