मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Goldy Brar: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा राईट हँड गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित!

Goldy Brar: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा राईट हँड गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित!

Jan 01, 2024 07:32 PM IST

Goldy Brar Declared Terrorist Under UAPA: केंद्र सरकारने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा राइट हँड गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित केले.

Goldy Brar (Satinderjit Singh)
Goldy Brar (Satinderjit Singh)

Goldy Brar Declared Terrorist: पंजाबी गायक सिद्ध मूसवाला यांच्या हत्येचा सूत्रधार आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा राइट हँड गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित करण्यात आले. केंद्र सरकारने सोमवारी यूएपीएअंतर्गत हा निर्णय जाहीर केला. ब्रार यांनी मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. तो पंजाबमधील फरीदकोटचा रहिवासी असून त्याचे खरे नाव सरतिदरजीत सिंह आहे. दरम्यान, २०१७ साली तो स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता. सिद्ध मूसेवाला यांची २९ मे २०२२ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

इंटरपोलने ब्रार यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सध्या कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे राहतो आ्णि बिश्नोई टोळींना सुपरवाइज करतो. याशिवाय तो खालसा इंटरनॅशनल संघटनांना शस्त्र पुरवतो. तसेच ड्रग्ज तस्करी ते तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्याचा समावेश आहे. कॅनडाने गोल्डी ब्रारचाही टॉप २५ मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला आहे.

सोमवारी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गोल्डी ब्रार बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. ब्रारला क्रॉस- बॉर्डर एजन्सीचा पाठिंबा आहे. अनेक हत्यांमध्ये त्याचा समावेश आहे. अनेक नेत्यांना धमकीचे कॉल करणे, खंडणीची मागणी करणे आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येचे दावे पोस्ट करणे, यात त्याचा सहभाग होता. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे उच्च दर्जाची शस्त्र, दारूगोळा आणि स्फोटक वस्तूंची तस्करी करण्यात त्याचा सहभाग आहे. याशिवाय, तो हत्या करण्यासाठी शार्प शूटर देखील पुरवतो.

ट्रेंडिंग न्यूज

मंत्रालयाने म्हटले आहे की, ब्रार आणि त्यांचे सहकारी पंजाबमधील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहेत, ज्यात तोडफोड, दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, हत्या आणि इतर देशविरोधी कारवायांचा समावेश आहे. यूएपीए अंतर्गत एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित केल्याने एजन्सींना त्यांची मालमत्ता जप्त करण्याची, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर खटला चालवण्याची आणि प्रत्यार्पणासाठी एक मजबूत केस बनवण्याची परवानगी मिळते.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर