Viral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून व्हाल हैराण-golden toilet kept in churchill blenheim palace was stolen you will be surprised to know its price viral news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून व्हाल हैराण

Viral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून व्हाल हैराण

Apr 05, 2024 02:22 PM IST

Viral news : २०१९ मध्ये झालेल्या कला प्रदर्शनात ठेवण्यात आलेले इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल (churchill blenheim palace) यांच्या राजवाड्यातील तब्बल ५० कोटी रुपयांचे १८ कॅरेट सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी लंपास केले.

चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास
चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास

golden toilet kept in churchill blenheim palace was stolen : २०१९ मध्ये झालेल्या कला प्रदर्शनात ठेवण्यात आलेले तब्बल ५० कोटी रुपयांचे १८ कॅरेट सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ब्लेनहाइम पॅलेसला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा राजवाडा युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान आहे. या राजवाड्यात असलेले १८ कॅरेट सोन्याचे टॉयलेट २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कला प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या टॉयलेटची किंमत ४.८ दशलक्ष पौंड म्हणजेच म्हणजे भारतीय चलनात सुमारे ५० कोटी रुपये ऐवढी आहे. हा आलिशान कमोड प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी बनवला होता.

Raj Thackeray : मनसे-भाजप युतीचं काय झालं?; राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत सांगणार

सोन्याचे असलेले हे महागडे टॉयलेट वेलिंगबरो येथील जेम्स शीन नावाच्या व्यक्तीने चोरले होते. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शीनने ऑक्सफर्ड क्राउन कोर्टात दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा गुन्हा देखील कबूल केला. शीनने यापूर्वी अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. त्याने नॅशनल हॉर्स रेसिंग म्युझियममधून ४०००,००० पाउंड किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉफीसह अनेक वस्तूंची चोरी केली. यासाठी त्याने यापूर्वी १७ तुरुंगवास देखील भोगला आहे.

Congress manifesto : काँग्रेसच्या जाहीरमान्यात आरक्षणाबाबत मोठं आश्वासन; सत्ता येताच करणार 'या' १० गोष्टी

ऑक्सफर्ड शहराजवळील ब्लेनहाइम पॅलेसच्या आर्ट गॅलरीमध्ये सोन्याचे टॉयलेट काही दिवसांपूर्वी रात्री गायब झाले होते. या घटनेमुळे खबळल उडाली होती. या टॉयलेटची किंमत ४.८ दशलक्ष पाउंड आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु या प्रदर्शनाला भेट देणारे व्यक्ति हे शौचालय वापरण्यासाठी ३ मिनिटांसाठी बुक करू शकत होते.

या चोरीप्रकरणी आतापर्यंत कोणावरही आरोप करण्यात आलेला नाही, परंतु पोलिसांनी पुराव्याची एक फाईल क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसकडे सुपूर्द केली आहे, ज्याद्वारे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सोन्याचे टॉयलेट हा प्रकार केवळ ब्रिटनमध्येच नाही तर चीनमध्येही आहे. २०१९ मध्ये, हाँगकाँगच्या एका ज्वेलरने शांघायमधील चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये हिऱ्यांनी जडवलेल्या सोन्याच्या टॉईलचे अनावरण केले होते. या खास टॉयलेटमध्ये बुलेट प्रूफ काचेची टॉयलेट सीट आहे. त्यात ४०,८१५ छोटे हिरे लावण्यात आले आहे आहेत. त्यावेळी ते स्वच्छतागृहही देखील चोरीला गेले होते.

Whats_app_banner