Donald trump : अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू! पनामावरून चीनला इशारा; ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Donald trump : अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू! पनामावरून चीनला इशारा; ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Donald trump : अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू! पनामावरून चीनला इशारा; ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Jan 20, 2025 11:52 PM IST

Donald trump speech : शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा अवलंब करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, त्यांना जगभरातील "शांततादूत" बनायचे आहे.

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (via REUTERS)

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी एका भव्य समारंभात शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा अवलंब करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, त्यांना जगभरातील "शांततादूत" आणि "एकसंध" बनवणारा नेता बनायचे आहे. मला शांततेचा दूत मानावे, आम्हाला जगात शांतता हवी आहे. त्याचबरोबर अमेरिकेत भक्कम सैन्य उभं करायचं आहे, पण अमेरिकन सैनिक इतरांच्या युद्धात जाणार नाहीत, असंही ते म्हणाले. मात्र, युक्रेन युद्धाचा त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

  • अमेरिकेच्या सुवर्णयुगाला सुरुवात झाली आहे. जग आपला वापर करू शकणार नाही. आम्ही आमचे सार्वभौमत्व कायम ठेवू.
  • अमेरिकेत आज घसरण . माझं धोरण अमेरिका फर्स्ट असेल.
  • भ्रष्ट यंत्रणेने आतापर्यंत त्रास दिला. आता अमेरिका झपाट्याने बदलेल.
  • देशाच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी लागू करणार असल्याचे सांगत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. बेकायदा स्थलांतरित जिथून आले आहेत, त्यांना परत पाठवले जाईल, असे ते म्हणाले.
  • शपथ घेताच ट्रम्प यांनी बायडन सरकारवर हल्ला चढवला आणि सांगितले की, मला ८ वर्षांपासून आव्हान दिले जात आहे.
  • बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेल्या धोकादायक गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर हल्ला चढवला.
  • ते म्हणाले की, बायडेन यंत्रणा आपत्तीशी लढण्यात अपयशी ठरली. कॅलिफोर्नियातील अग्निशामक यंत्रणा जलद गतीने होणार आहे.
  • माझं आयुष्य अमेरिकेला महान बनवण्यासाठी गेलं.  २० जानेवारी २०२५ हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे. यापुढे अमेरिकेत सेन्सॉरशिप राहणार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल.
  • अमेरिकेतील ड्रग्ज तस्कराला दहशतवादी घोषित केले जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. लष्कर आपल्या मोहिमेसाठी मोकळे असेल.
  • अमेरिका पुन्हा महान होईल, असे ट्रम्प म्हणाले. सर्वांना समान संधी मिळेल, सर्वांना समान वागणूक मिळेल. वर्णभेद होणार नाही आणि प्रतिभेला प्राधान्य दिले जाईल.
  • डोनाल्ड ट्रम्प शपथ घेताच अॅक्शन मूडमध्ये दिसले.  त्यांनी दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. सीमेवर सैन्य पाठवण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली.
  • अमेरिकेतील राजकीय सूडबुद्धी संपवू.
  • अमेरिकन नागरिकांना समृद्ध करण्यासाठी आम्ही इतर देशांच्या उत्पादनांवर कर लादणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, अमेरिकेचा झेंडा अंतराळात फडकेल. पनामा कालव्याचा ताबा आम्ही परत घेऊ
  • ट्रम्प म्हणाले की, पनामा कालव्यातून जाण्यासाठी अमेरिकन जहाजांकडून अधिक शुल्क आकारले जात आहे. पनामा कालवा परत घेण्याचा निर्धार त्यांनी केला.
  • 'एका कारणास्तव माझा जीव वाचला. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी देवाने मला वाचवले.
  • आम्ही अमेरिकेच्या इतिहासातील चार महान वर्षांच्या उंबरठ्यावर उभे आहोत
  • "मी तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासाठी लढेन आणि मी तुमच्यासाठी जिंकेन.
  • अनेकांना असे वाटत होते की, मला असे ऐतिहासिक राजकीय पुनरागमन करणे अशक्य आहे, परंतु आज आपण पाहिल्याप्रमाणे मी येथे आहे.

 

 

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर