Goat Viral Video: बकरीला लागलंय भलतंच व्यसन, समोर ग्लास दिसताच...; व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Goat Viral Video: बकरीला लागलंय भलतंच व्यसन, समोर ग्लास दिसताच...; व्हिडिओ व्हायरल!

Goat Viral Video: बकरीला लागलंय भलतंच व्यसन, समोर ग्लास दिसताच...; व्हिडिओ व्हायरल!

Jun 03, 2024 01:14 PM IST

Viral Video: बकरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

बकरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बकरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral News: सोशल मीडियावर (Social Media) कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एका बकरीला (Goat Viral Video) जेवणाआधी काय प्यायला लागते? हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बकरीच्या व्यसनाची सर्वत्र चर्चा रंगली असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की, तिची बकरी चहा प्यायल्याशिवाय काहीही खात नाही किंवा पीत नाही. व्हिडिओमध्ये मुलगी बकरीसमोर ग्लास भरून चहा ठेवते. त्यानंतर बकरीही लगेच चहा प्यायला सुरुवात करते. बकरीला चहा पिताना क्वचितच कोणी पाहिले असेल, पण या व्हिडिओने सगळ्यांचा भ्रम मोडला आहे. चहा प्रेमी हा केवळ माणूसच नाही तर प्राणीही असू शकतो हे या व्हिडिओने सिद्ध केले.या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. 

बकरीची चहाची लगबग पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ घंटा या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यावर लोक खूप मजेदार कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, “ती बाग बकरी टी कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.”

Viral Video: तहानलेल्या कुत्र्याला रेल्वे कर्मचाऱ्याने पाणी पाजले

दक्षिण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने तहानलेल्या कुत्र्यासाठी केलेल्या हावभावाने नेटकऱ्यांची मने जिंकली. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आपली तहान भागवण्यासाठी वॉटर कूलरचा नळ चाटताना दिसत आहे. मात्र, कुत्र्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. कुत्र्याला प्रयत्न करताना पाहून रेल्वे स्थानकातील एक महिला कर्मचारी कुत्र्याच्या मदतीला धावून आली. महिलेने नळातून कागदी कप पाण्याने भरला आणि कुत्र्यासमोर ठेवला. त्यानंतर कुत्रा आपली तहान भागवण्यासाठी कपातील पाणी पिताना दिसला. हा व्हिडिओ केरळमधील त्रिशूर रेल्वे स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमधील महिलेच्या कामगिरीचे सोशल मीडियावर मनापासून कौतूक होत आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर