गोव्यातील एका हॉटेलमध्ये एका पुरुष आणि महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पुरुषाचा मृत्यू झाला, पण महिला रुग्णालयात दाखल आहे. हे दोघेही कर्नाटकातील बिदर भागातील रहिवासी आहेत. महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत व्यक्तीचे वय ४५ वर्षे असून तरुणीचे वय २५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्याच्या किनारपट्टीवरील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये हे दाम्पत्य १९ ऑक्टोबर रोजी गेले होते. त्याच दिवशी त्यांना चेक-आऊट करायचे होते, पण त्यांनी आणखी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी हॉटेलचे कर्मचारी त्यांच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. हॉटेलच्या स्टाफला तो व्यक्ती पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तेव्हा एक व्यक्ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्याचा मृत्यू झाला होता. तिथे एका महिलेने हाताची नस कापला होती. महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ते दोघे विवाहित असल्याचे समोर आले आहे. त्यांची कुटुंबंही वेगवेगळी आहेत, पण गोव्याच्या सहलीला ते एकत्र आले होते. महेश सुंतुरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पत्नी आणि तीन मुले असल्याचे समोर आले आहे. या महिलेचे लग्नही झाले होते. चार वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले असून तिला अद्याप अपत्य नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार असून, त्यातून अधिक माहिती समोर येऊ शकते.
संबंधित बातम्या