मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyank kharge: सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं; कॉंग्रेस नेत्याचं भयंकर वक्तव्य

Priyank kharge: सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं; कॉंग्रेस नेत्याचं भयंकर वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 13, 2022 10:59 AM IST

Government Jobs In Karnataka : कर्नाटकात तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची असेल तर त्यांना लाच द्यावी लागते आणि तरुणींना नोकरीसाठी एखाद्यासोबत झोपावं लागतं, असं धक्कादायक वक्तव्य कॉंग्रेसच्या आमदारानं केलं आहे.

Congress MLA Priyank Kharge
Congress MLA Priyank Kharge (HT_PRINT)

Congress MLA Priyank Kharge : सध्या देशभरात बेरोजगारीवरून वातावरण पेटलेलं असतानाच आता कर्नाटकातील कॉंग्रेस आमदारानं एक नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कर्नाटकातील भाजप सरकारवर टीका करताना कॉंग्रेसचे आमदार प्रियांक खर्गेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'सरकारी नोकरीसाठी कर्नाटकातील तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं', असं वादग्रस्त वक्तव्य खर्गे यांनी केल्यानं आता त्यावर राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात गाजत असलेल्या भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करताना प्रियांक खर्गे म्हणाले की, राज्यात तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते तर तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं, त्यामुळं राज्य सरकारनं भरती घोटाळ्याचा तपास SIT मार्फत करायला हवा आणि त्यासंदर्भातील सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी खर्गेंनी केली आहे.

सरकारनं पदांना विकण्याचा निर्णय घेतलाय...

कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. राज्यात अनेक सरकारी पदभरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून राज्यातील भाजप सरकारनं पदांना विकण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय राज्यात एका मंत्र्यांनं तरुणीला नोकरी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचाही धक्कादायक आरोप खर्गे यांनी केला आहे.

राष्ट्रवादाचा व्यापार केला जातोय...

जर सगळ्याच प्रकारच्या पदभरतीत भ्रष्टाचार झाला तर गरीब आणि गुणवत्ता असलेले विद्यार्थी कुठे जातील?, पदभरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकारचं अभय असून सरकार राज्यातील तरुणांच्या भविष्याचं वाटोळं करत असल्याचा घणाघात खर्गेंनी केला. याशिवाय त्यांनी 'हर घर तिरंगा' या केंद्राच्या अभियानावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजप राष्ट्रवादाचा व्यापार करत आहे, झेंड्यांच्या विक्रीतून रिलायन्स कंपनीला मोठा आर्थिक फायदा होत असून अधिकाऱ्यांना सेल्समन बनवण्यात आलं आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापून त्यांना झेंडे खरेदी करायला लावलं जात असल्याची टीकाही खर्गे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या