‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर

Published Feb 16, 2025 01:42 PM IST

Viral News : ब्रेकअप झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून तिने बॉयफ्रेंडच्या घरच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत एकाच वेळी १०० पिझ्झाची ऑर्डर दिली.

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर

Viral News : गुरुग्राममधील एका २४ वर्षीय तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या एक्स बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला. प्रेससीने शिकवलेला धडा हा तरुण कधीही विसरू शकणार नाही. दोघांचेही काही दिवसांपूर्वी  ब्रेकअप झाले होते. या ब्रेकचा बदला  तरुणीने घेण्यासाठी प्लॅन रचला. या साठी तरुणीने तरुणीने व्हॅलेंटाईन डे चा दिवस निवडला. 

काय केलं नेमकं ? 

प्रेसिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून बॉयफ्रेंडच्या घरच्या पत्त्यावर एकाच वेळी १०० पिझ्झा मागवले, तेही कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाने. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी पिझ्झा आले तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड हादरला.

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने ऑर्डर डिलिव्हरी करून पैसे मागितले तेव्हा त्याची परिस्थिती बिकट झाली. एक्सने  या ऑर्डरची काहीच माहिती नसल्याचा दावा केला, ज्यामुळे त्याच्यात आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद झाला. १००  पिझ्झा पाहून परिसरातील लोकही त्याच्या घराजवळ जमा झाले. यामुळे ही घटना परिसरात  मोठ्या चर्चेची ठरली. एवढेच नाही तर ही बातमी सोशल मीडियावर देखील व्हायरल झगली. यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. 

सोशल मीडियावरही ही बातमी पसरली. काही लोकांनी ही घटना गमतीशीर मानली आणि हसण्याच्या इमोजीसह कमेंट केल्या, तर काहींनी प्रेयसीची ही कृती बालिश आणि चुकीची असल्याचे म्हटले. ब्रेकअपनंतर एखाद्याला त्रास देणे योग्य नाही, असे अनेकांनी लिहिले आहे.  तर काही लोकांनी या घटनेचं वर्णन फिल्मी सीन असं केलं आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर