मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणानंतर प्रेयसीने ट्रेनसमोर मारली उडी, समोरून आली वेगवान ट्रेन; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणानंतर प्रेयसीने ट्रेनसमोर मारली उडी, समोरून आली वेगवान ट्रेन; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

May 27, 2024 08:58 PM IST

Girlfriend Jumped In Front of Train : प्रियकराशी झालेल्या वादातून तरुणीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकर समोर पाहातच राहिला. जखमी प्रेयसीने उपचारादरम्यान रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.

बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणानंतर प्रेयसीने ट्रेनसमोर मारली उडी
बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणानंतर प्रेयसीने ट्रेनसमोर मारली उडी

उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथे एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने प्रियकराशी झालेल्या वादातून ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकर समोर पाहातच राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोमवारी (२७ मे) राजा मंडी रेल्वेवे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर एक प्रेमी युगुल बसून गप्पा मारत होते. त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून वाद निर्माण जाला. त्यानंतर रागाच्या भरात प्रेमिका समोरच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर उतरली. इतक्यात ट्रकवरून भरधाव आलेल्या केरला एक्सप्रेस गाडीने तिला उडवली. प्रेयसीच्या अंगावरून ट्रेन जात असताना प्रियकर काहीच करू शकत नव्हता. तो कवळ बघत राहिला. ट्रेन येण्याच्या आधी त्याने तिला वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमी अवस्थेत महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा ३० सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा विवाह झाला असून त्यानंतरही ती प्रियकरासोबत लिव इन मध्ये रहात आहे.

भरधाव ट्रेनने तिला २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ट्रेन थांबल्यानंतर आरपीएफने महिलेला गंभीर अवस्थेत एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे तीन तासानंतर तिचा मृत्यू झाला.

आरपीएफ निरीक्षक समर बहादुर सिंह यांनी सांगितले की, भारती उर्फ रानी (वय ३८) लोहामंडी येथील सिर की मंडी बर्फखाना वस्तीत रहात होती. सोमवारी सकाळी प्रियकर किशोर (वय२६) सोबत तिचे भांडण झाले.त्यानंतर प्रियकराला भीती घालण्यासाठी भारती आत्महत्या करणार असल्याची धमकी देऊन राजामंडी स्टेशनवर आली. तिच्या मागोमाग पतीही स्टेशनवर आला. तेथील एका बाकड्यावर बसून दोघे गप्पा मारत होते. त्यानंतर दोघांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर महिला सकाळी ११ वाजून १० वाजता रेल्वे रुळावर उतरली. त्यानंतर समोरून येणारी केरला एक्सप्रेस पाहून जीव वाचवण्याचाही प्रयत्न केला मात्र ट्रेनने तिला उडवले. ट्रेन थांबल्यानंतर तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले तेथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

तीव्र वळणामुळे ट्रेन दिसली नाही अन् जीव गेला –

राजामंडी स्टेशनवर तीव्र कर्व असल्या कारणाने भारतीला ट्रेन दिसली नाही. जशी ट्रेन (ट्रेन संख्या१२९२५केरला एक्सप्रेस) दिसली तिने जीव वाचवण्यासाठी पटरीवर येण्याचा प्रयत्न केला. मात्र प्लॅटफार्मवर चढण्यापूर्वीच ट्रेनने तिला फरफटत नेले. ही ट्रेन राजामंडी स्टेशनवर थांबत नसल्याने भरधाव वेगात होती.

महिलेला तीन मुले, पहिल्या पतीचे निधन –

जगदीशपुरा निवासी मृत महिलेचे वडील विनोद यांनी सांगितले की, महिलेच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ती फास्ट फूडचा गाडा चालवणाऱ्या किशोरच्या संपर्कात आली व त्याच्यासोबत लिव इन मध्ये राहू लागली. तिला पहिल्या पतीपासून तीन मुला आहेत. मोठा मुलगा नातेवाईकांसोबत राहतो. दोन मुलांसह ती किशोरसोबत राहत होती. किशोरने सांगितले की, भारती त्याच्यावर संशय घेत होती. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४