उत्तरप्रदेश राज्यातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे प्रियकरावर संतापलेल्या तरुणीने त्याच्यासोबत असे काही केले, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लग्न ठरल्यानंतर प्रियकर प्रेयसीला भेटायला आला होता. दोघांनी एका गेस्ट हाऊसमध्ये रूम घेऊन संबंध प्रस्थापित केले. दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते, या दरम्यान प्रेयसीने पेपर कटरने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला. आपल्यासोबत काय झाले आहे, हे समजण्याआधी तरुण रक्तबंबाळ झाला. संपूर्ण खोलीत रक्त पसरले.
पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथून त्याला मेरठ येथे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दोघेही एकाच गावचे आणि एकाच जातीचे असल्याचे सांगितले जात आहे.
चरथावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुल्हेडी गावात राहणाऱ्या युवक-युवतीचे आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण त्यांच्या या नात्यावर त्यांचे कुटुंबीय खूश नव्हते. त्यांचा या लग्नाला विरोध होता. दोघांच्या कुटूंबीयांनी दोघांनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी या तरुणाच्या कुटुंबीयांनी मेरठ जिल्ह्यातील एका गावात त्याचे लग्न ठरवले होते. यावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते.
शनिवारी प्रेयसीने आपल्या प्रियकराला शेवटचे एकदा भेटायचे असल्ल्याचे सांगून बोलावले. रविवारी सकाळी आठ वाजता प्रियकर आपली कार घेऊन गावातून निघाला आणि गावाबाहेरून प्रेयसीला कारमध्ये बसवले. दोघांनी आधी एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर लोटस प्लाझा येथील गेस्ट हाऊसमध्ये रूम भाड्याने घेतली. दुपारी दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत असताना मुलीने पेपर कटरने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत कापून टाकला.
ओढाओढीत तरुणीच्या हातालाही कटर लागून ती जखमी झाली आहे. रुममधून ओरडण्याच्या आवाजानंतर लॉजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिस प्रभारी आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या