मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रियकराच्या साखरपुड्यात प्रेयसीचा डान्स, लग्नाच्या दिवशी आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले...

प्रियकराच्या साखरपुड्यात प्रेयसीचा डान्स, लग्नाच्या दिवशी आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 28, 2024 05:31 PM IST

Uttar Pradesh Kanpur Suicide: प्रियकराच्या लग्नाच्या दिवशी प्रेयसीने गळफास लावून आत्महत्या केली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून प्रेमाची अनोखी कहाणी समोर आली. प्रियकराच्या लग्नाच्या दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणी प्रियकराच्या साखरपुड्यात नाचली होती. मात्र, लग्नाच्या दिवशी तिने आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

चांदौली येथील नरामनारायण यांची मुलगी संगीता यादव (वय, ३०) ही महापालिकेत संगणक परिचालक होती. ती गेल्या सहा महिन्यांपासून आंबेडकरपुरम येथील मनोरमा देवी यांच्या घरात भाड्याने राहत होती. मंगळवारी संगीता हिने तिच्या खोलीत ओढणीनेच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात मृतदेह लटकलेला पाहून घरमालकाने पोलीस आणि तिच्या कुटुंबांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड सापडली. प्रियकराच्या लग्नाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे कल्याणपूर पोलिस निरीक्षकांनी सांगितले. प्रियकराच्या साखरपुड्यात तरुणी सहभागी झाली होती. त्यानंतर तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

संबंधित तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे की, "आई, पप्पा मला माफ करा. मी हे चुकीचे पाऊल उचलत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी तणावात आहे. त्यामुळे मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमागे कोणीही जबाबदार नाही.

अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जाणारी कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जण ठार

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तरुणीच्या प्रियकराच्या साखरपुडाच्या दिवशी त्याच्या घरी गेली आणि नाचली. मात्र, प्रियकराच्या लग्नामुळे दुखावलेल्या सोमवारी तिने आत्महत्या केली. मात्र, सुसाईड नोटमध्ये तिने प्रियकराच्या नावाचा उल्लेख केला नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी तरुणीचा मोबाईल जप्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग