मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रील बनवण्यासाठी ट्रकजवळ उभी राहिली.. इतक्यात पाठीमागून आली सुसाट ट्रेन, पाहा मृत्यूचा लाईव्ह VIDEO

रील बनवण्यासाठी ट्रकजवळ उभी राहिली.. इतक्यात पाठीमागून आली सुसाट ट्रेन, पाहा मृत्यूचा लाईव्ह VIDEO

Jun 07, 2024 08:54 PM IST

Viral Video : एक तरुणी रील बनवण्याच्या नादात रेल्वे रुळाच्या इतक्या जवळ जाऊन उभी राहिली की, तिला ट्रेनची जोरदार धडक बसली. तरुणी जागीच कोसळली ती परत उठलीच नाही.

रील बनवण्याच्या नादात तरुणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
रील बनवण्याच्या नादात तरुणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आजकाल तरुणांमध्ये सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळवण्याचे भूत सवार आहे. मात्र हा नाद कधी-कधी जीवावर बेतू शकतो. सध्या मेक्सिको येथील हिडाल्गो येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीला रेल्वे समोर रील बनवण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागला.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, हिडाल्गो येथे एक रेल्वे ट्रॅकच्या जवळ डझनभर लोक वाफेच्या इंजिनाच्या ट्रेनची वाट पाहात होते. त्यातील काही लोक ट्रेनसोबत सेल्फी घेण्यासाठी व व्हिडिओ बनवण्यासाठी ट्रॅकच्या खूपच जवळ जाऊन उभे राहिले. व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, दुर्घटना टाळण्यासाठी ट्रेन ड्रायव्हर हॉर्न वाजवत आहे. मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करत ट्रॅकच्या जवळ जातात. यावेळी एक तरुणी रील बनवण्याच्या नादात रेल्वे रुळाच्या इतक्या जवळ जाऊन उभी राहिली की, तिला ट्रेनची जोरदार धडक बसली. तरुणी जागीच कोसळली ती परत उठलीच नाही. रिपोर्टनुसार या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

तरुणीच्या लाईव्ह मृत्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक यातून काहीतरी धडा घेण्याचे बोलत आहेत.@ManyFaces_Death एक्स हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या क्लिपला आतापर्यंत जवळपास दोन लाख वेळा पाहिली गेली आहे. व्हिडिओ पाहून लोक हळहळत आहेत. अनेक इंटरनेट यूजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रील बनवण्याच्या दरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते.

महिला सेल्फ घेण्याच्या तयारीत असतानाच मागून भरधाव येणाऱ्या ट्रेनचा कोपरा महिलेच्या डोक्याला धडकतो आणि महिला जागेवरच कोसळते. महिला जागची हाललीच नाही. अचानक घडलेल्या या घटनेने इतर पर्यटकांमध्ये खळबळ उडते. एक व्यक्ती खाली कोसळलेल्या महिलेला उठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेकडून कोणतीची हालचाल दिसत नाही. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की महिला जागीच गतप्राण झाली. मृत महिला आपला मुलगा आणि त्याच्या शाळेतील इतर मुलांबरोबर हिडाल्गो या ठिकाणी आली होती. मुलांबरोबर या महिलेला जुन्या ट्रेनचा फोटो घ्यायचा होता.ट्रेनसोबत सेल्फी घेण्यासाठी ती इतकी पुढे निघून गेली की, ट्रेन जवळ आल्याचे तिला भानच राहिले नाही. ती पाठमोरी असताना ट्रेनने तिला धडक दिली. महिलच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग