Himachal Chaba Viral video : आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते. अनेकदा जिवावर बेटणारे स्टंट देखील केले जातात. केवळ काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी जीव धोक्यात घालायला देखील ते मागेपुढे पाहत नाहीत. व्हायरल होईल असा व्हिडिओ तयार करतांना अनेक अपघात देखील घडले आहेत, ज्यात व्हिडिओ करणाऱ्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील चंबा येथील आहे. व्हिडिओत एक तरुणी डोंगराच्या कड्यावर रील्स तयार करतांना डान्स करत आहे. डान्स करतांना तिचा पाय घसरतो आणि ती दरीत कोसळते. हा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चंबाच्या व्हिडिओमध्ये एक मुलगी डोंगराच्या कडावर डान्स करतानाचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडली. पडताना ती ओये मम्मी म्हणते. मात्र, मुलगी नशीबवान होती, त्यामुळे गटांगळ्या खात दरीत कोसळली आणि एका दगडाला अडकून थांबली. यामुळे थोडक्यात तिचा जीव वाचला. अन्यथा तिचा जीव गेला असता. या घटनेत तरुणीला मार देखील लागला आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विचारत आहेत की, रीलच्या मागे धावून आपला जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? काही नेटकऱ्यांनी तर या मुलीवर संताप देखील व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओवर, एका सोशल मिडीया यूझरने लिहिले की, 'हा खूप चांगला रील आहे, असे रील तयार करणे थांबू नये.' आणखी एका यूजरने संताप व्यक्त करत लिहिले की 'अशा लोकांसोबत असचं व्हायला हवं'. तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'पप्पाची इनिंग उडण्याऐवजी घसरत आहे.' चौथ्या वापरकर्त्याने लिहिले, 'तंत्रज्ञानाने लोकांना जोडले आहे परंतु प्रत्येकजण आत एकटा आहे, काही आदर आणि लोकांचं लक्ष खेचण्याच्या आशेने हे वेड भविष्यात आणखी वाढणार आहे.