Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे एक बाप आपल्या मुलीच्या कारस्थानांमुळे इतका वैतागला की, त्याला पोलिसांचा आश्रय घ्यावा लागला. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी रात्री जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळते आणि नंतर प्रियकराला फोन करून तिच्या प्रियकराला घरी बोलवून घेते. मुलीच्या अशा वागणुकीला वैतागून तिच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले.
रायबरेली जिल्ह्यातील ऊंचाहार कोतवाली भागातील एका गावात ही घटना घडली आहे. गावातील एका तरुणाचे शेजारच्या गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हा तरुण काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला होता. त्यानंतर कुटुंबाने दोघांचा शोध घेऊन त्यांना परत घरी आणले. दोघांनाही ग्रामपंचायतीत समज देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांची मुलगी अजूनही संबंधित तरुणाच्या संपर्कात आहे आणि त्याला भेटण्यासाठी त्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकते.
संबंधित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी रात्री जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळते. त्यामुळे जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब गाढ झोपते. त्यानंतर ती आपल्या आपल्या प्रियकराला फोन करून घरी बोलवते. तरुणाला भेटण्यासाठी ती आपल्या कुटुबियांच्या जीवाशी खेळत आहे. मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात आपल्या १४ वर्षीय मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली. सुलतानपूर पट्टी येथील रहिवासी प्रेम शंकरने गुरुवारी आपला १४ वर्षीय मुलगा विवेक याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तो घरात खड्डा खोदून त्यात मुलाचा पुरण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याच्या वहिनीने त्याला पाहिले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गळा आवळून पोटच्या मुलाची हत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
पोलीस चौकशीदरम्यान प्रेम शंकरने सांगितले की, त्याची पत्नी तीन वर्षांपूर्वी निघून गेली. त्यांची तीन मुले काशीपूरच्या बिश्नोई सभेच्या अनाथाश्रमात राहतात. मोठा मुलगा विवेक एक महिन्यांपूर्वी घरी आला होता. प्रेम शंकरची पत्नी तीन वर्षांपासून निघून गेली. त्यामुळे तो नैराश्यात होता. प्रेम शंकरने त्याच्या मुलाला पुन्हा अनाथाश्रमात जाण्यास सांगितले. मात्र, मुलाने नकार दिला. यानंतर संतापलेल्या प्रेम शंकरने मुलाची गळा आवळून हत्या. आरोपीच्या वहिनीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची तुरुंगात पाठवण्यात आले.