अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात तरुणीची आत्महत्या, सातव्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात तरुणीची आत्महत्या, सातव्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात तरुणीची आत्महत्या, सातव्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

Nov 07, 2024 04:22 PM IST

सुवर्ण मंदिर परिसरात गुरुवारी एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. गुरुद्वारा बाबा अटल राय बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली.

गुरुद्वारा परिसरात तरुणीची आत्महत्या
गुरुद्वारा परिसरात तरुणीची आत्महत्या

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा बाबा अटल राय इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मुलीने उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. घाईघाईत पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला एकटीच सुवर्ण मंदिरात पोहोचली होती आणि तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारणही शोधले जात आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त विशालजीत सिंह यांनी सांगितले की, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सुवर्ण मंदिर परिसरात असलेल्या बाबा अटल राय या सात मजली गुरुद्वाराच्या दर्शनासाठी सार्वजनिक वेळ सकाळी ७.३० ते १०.३० अशी होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलेने इमारतीवर चढून सातव्या मजल्यावरून उडी मारली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आली होती. सकाळी ९.३० वाजता तिने गुरुद्वारा अटल राय साहिबच्या सातव्या मजल्यावर चढून तिथून उडी मारली. डोक्यावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भाविकांची पळापळ झाली. गुरुद्वारा साहिबच्या सेवकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.

आत्महत्या केलेल्या मुलीची अद्याप ओळख पटली नसली तरी तिचे वय २५ वर्षांच्या आसपास आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही मुलगी सुवर्ण मंदिरात एकटीच आली होती की तिच्यासोबत आणखी कोणी आले याचा तपास पोलिस करत आहेत.

सुवर्णमंदिर परिसरात आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच घटना नाही. २० ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याला सेवेकऱ्यांनी वाचवले होते. २२ सप्टेंबर रोजी सुवर्ण मंदिराबाहेर एका तरुणाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाचे पिस्तूल हिसकावून स्वत:वर गोळी झाडली होती. गुरु नानक देव रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर