अवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल

अवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल

Dec 03, 2024 12:39 PM IST

Avadh Ojha Viral News : दिल्लीतील यूपीएससी कोचिंग शिकवणारे अवध ओझा यांनी नुकताच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. सोशल मिडीयावर ते प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अवध ओझा गुंड! क्लासमध्ये इनरवेअर घालून सतत सेक्सबद्दल बोलतो; दिल्लीतील यूपीएससी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
अवध ओझा गुंड! क्लासमध्ये इनरवेअर घालून सतत सेक्सबद्दल बोलतो; दिल्लीतील यूपीएससी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

Avadh Ojha Viral News : यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सेंटर चालवणारे दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. ओझा यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते दिल्लीत विधानसभा निवडणूकही लढवणार असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवध ओझा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चिले जाऊ लागले आहेत. त्यांच्या क्लासमधल्या एका तरुणीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या तरुणीने अवध ओझा यांची पोलखोल केली आहे. या तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणीने ओझा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार अवध ओझा सर चांगले शिक्षक नाहीत. एका महिला पत्रकाराने या तरुणीला अवध ओझा यांच्याबद्दल विचारल्यावर ही तरुणी चांगलीच भडकली. तरुणी म्हणाली की, ओझा सर एक नंबरचा गुंड आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत मी त्यांची विद्यार्थीनी होती. मी दोन महिने त्यांचे क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी इतिहास शिकवला नाही. त्यांची त्यांचा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला नाही. त्यांनी फक्त ४ गुण शिकवले. मुलांना वर्गात शिकवण्यासाठी येतांना ते इनरवेअर घालून यायचे. ऐवढेच नाही तर शिकवण्या ऐवजी वर्गात फक्त सेक्सबद्दल बोलत बोलायचे. जेव्हा मी याबाबत तक्रार केली तेव्हा ते फक्त हसले. त्यांना कोणत्याही प्रकारचा आदर नाही. ते फक्त प्रवचन देतात आणि सेक्सबद्दल बोलतात. माझ्या आईनेही त्याला ऑनलाइन क्लासेसमध्ये पाहिले आहे. त्यांना माहित आहे की आजच्या लोकांना आणि मुलांना हे सर्व ऐकायचे आहे, त्यांचा शिक्षणाचा संबंध नाही आणि ते सर्वांना समान मानतात. विशेषतः दुर्गम खेड्यातील मुले दिल्लीत शिकायला येतात. त्यांना रोल मॉडेल समजतात. मात्र, असे काही ही नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थीनी म्हणाली, पूर्वी असे नव्हते. हे सर्व आताच होत आहे. वर्गात ते अभ्यासाच्या दोन गोष्टी आणि ज्ञानाच्या चार गोष्टी बोलणार, त्यापैकी दोन ज्ञानाच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होणार. त्यांना यूट्यूब वरून पैसे मिळतात, ते इतिहास शिकवत नाहीत, त्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण होत नाही. ते क्वचितच चार वर्ग घेतात. या तरुणीचा हा व्हिडिओ @MrSinha_ नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'आप'मध्ये प्रवेश केल्यानंतर ओझा सर काय म्हणाले?

आम आदमी पक्षात प्रवेश केल्यावर ओझा म्हणाले, ते मुलांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. भविष्यात राजकारणाच्या माध्यमातून शिक्षणाचा विकास करणे ही त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा आहे. राजकारणातून शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचे ओझा यांनी आभार मानले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्ष शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत आहेत. ओझा यांनी पक्षात प्रवेश केल्याने शिक्षण क्षेत्र बळकट करण्याच्या प्रयत्नांना वेग येईल. तर सिसोदिया म्हणाले की हा एक चांगला दिवस असून ओझा हे शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करत आहेत, ज्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२० मध्ये ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत आपने ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यांना आता सलग तिसऱ्यांदा विजयाची आशा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर