मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला; व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार; नातेवाईकाचं घृणास्पद कृत्य

तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला; व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार; नातेवाईकाचं घृणास्पद कृत्य

Jun 14, 2024 03:04 PM IST

Rajasthan Girl student Rape: राजस्थानमध्ये तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

राजस्थानमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजस्थानमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (HT_PRINT)

Rajasthan Alwar Rape: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रेणी पोलिसांच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. लग्न समारंभात गेलेल्या एका व्यक्तीने नात्यातील तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडिताच्या वडिलांनी रेणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२२ रोजी पीडिताच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्यावेळी आरोपीने तिचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ९ एप्रिल २०२४ रोजी पीडिता कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली असता आरोपीने तिचे अपहरण केले.

आरोपीने पीडिताला कारमध्येच कोल्ड ड्रिंक पाजले. त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिला गाझियाबादहून दिल्लीला नेले. त्याच रात्री आरोपी तिला जयपूरला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर आरोपीने पीडिताला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.२५ एप्रिल २०२४ रोजी आरोपी पीडिताला खोलीत कोंडून निघून गेला. त्यावेळी आरोपी त्याचा फोन खोलीतच विसरून गेला. पीडिताने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला भेटण्यासाठी जयपूरला पोहोचले आणि तिला आपल्यासोबत गावात आणले. पीडितेच्या वडिलांनी रेणी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास डीएसपी राजगड करत आहेत. अलवर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पण राजगडबद्दल बोलायचे झाले तर गेल्या दोन महिन्यांत अर्धा डझनहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असे दिसून येत आहे.

WhatsApp channel
विभाग