Viral News: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काही करेल? याचा काही नेम नाही. आपल्या व्हिडिओला सर्वाधिक लाइक्स आणि शेअर मिळवण्यासाठी अनेकजण धोकादायक स्टंट करतात. मात्र, असे स्टंट अनेकांच्या जीवावर बेतले आहेत. मात्र, तरीही काहीजण आपला जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुणीने धावत्या ट्रेन लटकून व्हिडिओ बनवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
@ChapraZila नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून तरुणीच्या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुणी आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. तरुणी धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून रील बनवत आहे. चुकूनही हात निसटला तर तिच्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडू शकते, याची तरुणीला चांगली जाणीव असतानाही ती रील बनवण्यात व्यस्त आहे.
तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक वेडे झाले आहेत, जीवापेक्षा त्यांना लाइक आणि शेअरचे अधिक महत्त्व वाटते, असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ट्रेन अपघातात एका चुकीमुळे आतापर्यंत कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही लोक त्याच चुकांची पुनरावृत्ती करत आहेत. आणखी एका युजरने म्हटले आहे की, ताई, असे करू नको, माणसाला आयुष्य एकदाच मिळते. एका युजरने म्हटले आहे की, कोणीतरी तिला समजावून सांगा, हे व्हिडिओ गेम नाही, ज्यामुळे दुसऱ्यांदा आयुष्य मिळायला.