हळदीचा कार्यक्रम झाल्यावर एक तरुणी लग्नमंडपातून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बिहार राज्यातील जमुई येथे घडली आहे. येथे प्रेमाचा असा प्रकार समोर आला की, तो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका तरुणीने साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तरुणीने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले.
तरुणाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाताना पोलिसांना घाम फुटला. पोलीस जेव्हा तरुणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले तेव्हा तरुणाने तरुणीला अशी काही घट्ट मिट्ठी मारली होती की, पोलिसांना त्यांना वेगळे करणे कठीण होऊन बसले. तरुण-तरुणी एकमेकांना सोडण्यास तयार नव्हते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणीच्या कुटूंबीयांनी तिचे लग्न ठरवले होते. घरात लग्नाची धामधूम सुरू होती व लग्नाचे विधी केले जात होते. घरचे लोक लग्नकार्यामुळे आनंदात होते. मात्र तेवढ्यात मुलीच्या प्रियकराची एंट्री झाली व लग्नाचा आनंद तणावात बदलला.
मुलगी लग्नाच्या ८ दिवस आधीच प्रियकरासोबत घरातून पळून गेली व मंदिरात जाऊन तिने लग्न केले. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर घरच्या लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर समजले की, तरुणी आपल्या प्रियकरासोबत त्याच्या गावात रहात आहे. पोलीस तरुणीच्या नातेवाईकांसह त्यांच्या घरात दाखल होताच ते एकमेकांना घट्ट मिठ्ठी मारून उभे राहिले. ते एकमेकांना सोडण्यास तयार नव्हते.
पोलीस तरुणाला चौकशीला घेऊन जाताना तरुणी त्याला बिलगली तिने त्याला सोडण्यास नकार दिला. पोलीस त्यांना वेगळे करताना ते म्हणत होते की, आम्ही मरू पण वेगळे होणार नाही.
संबंधित बातम्या