जीव जडला विषय संपला..! ६ महिन्यात तरुणीने केली ३ लग्नं, कहाणी वाचून जाल चक्रावून
एका तरुणीने केवळ ६ महिन्यात तीन लग्नं केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिन्ही वेळेला नवरा मुलगा वेगळा होता.
सध्या तरुण-तरुणींचे लग्न जुळवणे एक सामाजिक समस्या बनत असताना बिहार राज्यातील बेगूसराय शहरात एका तरुणीने केवळ ६ महिन्यात तीन लग्नं केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिन्ही वेळेला नवरा मुलगा वेगळा होता. तिसऱ्यांदा या मुलीने आधीची दोन लग्नं जुळवणाऱ्याशीच लग्न केलं. तरुणीची दोन लग्न मोडल्यानंतर तरुण तिला भेटायला रात्रीच्या वेळी गेला होता. तेथे लोकांनी पकडले व त्यांचे मंदिरात लग्न लावून दिले.
ट्रेंडिंग न्यूज
रिपोर्टनुसार या मुलीचे पहिले लग्न वीरपूर ठाणे क्षेत्रातील टारी गावात झाले होते. सिंटू कुमार या तरुणाने या विवाहात मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती. म्हटले जात आहे की, पहिल्या लग्नापासूनच सिंटू आणि आरतीमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले होते. त्यामुळे आरतीचा पहिला विवाह मोडला त्यानंतर सिंटूने आरतीसाठी आपल्या गावातील दुसरे स्थळ आणले व तिचे लग्न लावून दिले.
आरतीचा दूसरा पती दिल्लीत मजुरीचे काम करतो. काही दिवसापूर्वी तो कामासाठी दिल्लीला गेल्यानंतर सिंटू आरतीला भेटायला तिच्या घरी गेला. रात्रीच्या वेळी आरतीला भेटायला गेलेल्या सिंटूला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले.
सांगितले जात आहे की, पहिल्या लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलांनी मुफ्फसिल पोलीस ठाण्यात सिंटू याच्यासह अन्य लोकांविरुद्ध आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिंटू नेहमी आरतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता व नात्याचा फायदा घेत तिला सतत भेटायला जात होता.
विभाग