हिजाब सक्तीविरोधात भडकली तरुणी! विरोध करत भर विद्यालयात अंतर्वस्त्रासह कपडे काढले! VIDEO वायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिजाब सक्तीविरोधात भडकली तरुणी! विरोध करत भर विद्यालयात अंतर्वस्त्रासह कपडे काढले! VIDEO वायरल

हिजाब सक्तीविरोधात भडकली तरुणी! विरोध करत भर विद्यालयात अंतर्वस्त्रासह कपडे काढले! VIDEO वायरल

Updated Nov 03, 2024 11:36 AM IST

girl got angry over hijab in Iran : इराणमध्ये विद्यालयात हिजाब सक्तीचा विद्यार्थींनींनी विरोध केला आहे. या पूर्वीही हिजाब सक्ती कायद्या विरोधात इराणमध्ये महिलांनी जोरदार निदर्शने केली होती. मात्र, या महिलांचा आवाज दाबण्यात आला होता. दरम्यान, एका तरुणीचा हिजाब विरोधाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हिजाब सक्तीविरोधात भडकली तरुणी! विरोध करत भर विद्यालयात अंतर्वस्त्रासह कपडे काढले! VIDEO वायरल
हिजाब सक्तीविरोधात भडकली तरुणी! विरोध करत भर विद्यालयात अंतर्वस्त्रासह कपडे काढले! VIDEO वायरल

girl got angry over hijab in Iran :  भारतात काही दिवसांपूर्वी  हिजाबवरून वादंग उठले होते. काही विद्यालयात हिजाब बंदीला विरोध करण्यात आला होता. मात्र, मुस्लिम राष्ट्र असलेल्या इराणमध्ये हिजाब सक्ती विरोधात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.  इराणमधील एका विद्यापीठात एका विद्यार्थिनीने हिजाबसक्तीचा निषेध करत थेट कपडे काढले. ऐवढेच नाही तर या तरुणीने अंडरवेअर देखील काढली.  या घटनेमुळे इस्लामी आझाद विद्यापीठात शनिवारी मोठा गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिजाब सक्तीमुळे ही तरुणी  नाराज होती, असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षकांनी या तरुणीला अटक केल्याचं दिसत आहे. 

इराणच्या विद्यापीठात या तरुणीने आपले कपडे काढून एका कट्ट्यावर बसून राहिली. यावेळी एक व्यक्ति तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. मात्र, तरुणी विद्यापीठात विनाकपडे फिरताना दिसत आहे. 

या घटनेनंतर विद्यापीठाचे प्रवक्ते आमीर मेहजॉब यांनी एक्सवर  पोस्ट करत लिहिले की, मुलगी प्रचंड मानसिक दबावाखाली होती. मात्र, या अधिकाऱ्यांनी दिलेल्या  स्पष्टीकरणाशी इराण मधील महिला सहमत नाहीत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मुलीने हे  कृत्य जाणूनबुजून केल्याचं म्हटलं आहे.  

ली ला नावाच्या एका युजरने एक्सवर लिहिले की, " महिलांनी सार्वजनिक ठिकाणी अंडरवेअर घालून फिरणे हे सर्वात  वाईट असल्याचं म्हटलं आहे.  हिजाब सक्तीच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत.  इराणमध्ये  हिजाब सक्ती विरोधात महिलांनी आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी देखील महिलांनी प्रशासनाच्या हिजाब सक्ती विरोधात आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ मध्ये हिजाब बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका इराणी कुर्दिश तरुणीला अटक करण्यात आली होती. मात्र, या तरुणीचा  पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात मोठी निदर्शने करण्यात आली होती. मात्र, इराणई सुरक्षा दलांनी महिलांचे हे आंदोलन सक्तीने दडपून टाकले होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर