Moradabad gang rap : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये क्रूरतेची परिसीमा आरोपींनी ओलांडली. भगतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे कारमधून चार तरुणांनी अपहरण केले होते. आरोपीने पीडितेला घरात बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले. एवढेच नाही तर पीडित मुलीवर अॅसिड ओतून तिच्या हातावरील ओमचा टॅटू पुसण्यात आला. पीडितेच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भगतपूर पोलिस ठाण्याच्या एका गावात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी तिची १४ वर्षीय अल्पवयीन भाची कपडे शिवण्यासाठी मार्केट रोडमार्गे टेलरच्या दुकानात जात होती. त्यांच्या गावातील चार तरुण बाजाराजवळ कार घेऊन वाटेत उभे होते. या चौघांनी तिच्या भाचीला त्यांच्या कारमध्ये ओढून नेत तिचे अपहरण केले. आरोपीने तिला एका खोलीत नेऊन अंमली पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपीने मुलीवर भयंकर अत्याचार केले. पीडिटेला जबरदस्तीने गोमांसही खायला घातलं.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या भाचीच्या हातावरील 'ओम' चिन्ह अॅसिड टाकून पुसले. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, त्यांची भाची बेपत्ता झाल्यापासून ते तिचा शोध घेत होते. त्यानंतर दोन महिन्यांनी २ मार्च रोजी पीडित मुलगी भयानक अवस्थेत घरी परतली आणि आई-वडिलांना तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी भगतपूर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. भगतपूरचे एसएचओ संजय कुमार पांचाळ यांनी सांगितले की, सलमान, जुबेर, रशीद आणि आरिफ यांच्याविरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट आणि एससी/एसटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सलमानला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
संबंधित बातम्या