Viral News: सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये शर्यत लागली आहे. फॉलोवर्सची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, कधी-कधी काही गोष्टी आपल्या अंगलट येऊ शकतात, त्याचे ताजे उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुणी छतावर रील बनवत आहे. मात्र, तिच्यासोबत असे काही घडते की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा एकही दिवस गेला नसेल, ज्यांना नवीन काही पाहायला मिळाले नसेल. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ ज्ञानात भर घालणारे ठरतात. तर, काही व्हिडिओ हसून पोट दुखवणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या घराच्या छतावर डान्स करून रील बनवत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तरुणीने आपला फोन समोरच्या भिंतीवर ठेवला आहे. पण डान्स करत असताना काही सेकंदानंतर तिने भिंतीवर ठेवलेला फोन अचानक खाली पडतो. यानंतर तरुणी पटकन भिंतीवरून खाली पडलेला फोन उचलते. तिच्या हावभावावरून असे समजते की, फोनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असावे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण संबंधित तरुणी रील बनवत असताना कुणीतरी गुपचूप तिचा व्हिडिओ काढल्याचे समजत आहे.
@kattappa_12 नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'दीदीचा मोबाईल टाटा,बाय-बाय, खतम'. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'डान्सचा सराव सुरू होता, पण अचानक टीचर रागावली वाटते.' तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लीक झाला. तर, काही जणांनी हसायचे इमोजी शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या