Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणी प्यायली कुत्रीचं दूध, व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणी प्यायली कुत्रीचं दूध, व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणी प्यायली कुत्रीचं दूध, व्हिडिओ व्हायरल!

Dec 18, 2024 08:14 PM IST

Girl Drank Dogs Milk: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणीने चक्क कुत्रीचं दूध प्यायले, ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणी प्यायली कुत्रीचं दूध
व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणी प्यायली कुत्रीचं दूध

Viral News: सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही. व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी चक्क कुत्रीचे दूध पिताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स येत असून नेटकऱ्यांनी या तरुणीला चांगलेच ट्रोल केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत तरुणीचे हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे असल्याचे ही म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक कुत्री जमीनीवर झोपली आहे. तर, बाजूला असलेली तरुणी कुत्रीच्या स्तनाला तोंड लावून तिचे दूध पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ममता राजगड नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आली. तर, @JaikyYadav16 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आला. 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आता देवच या देशाला वाचवू शकतो. इंस्टाग्राम रीलने लोकांच्या विवेकबुद्धीला कुलूप लावले आहे. लोक लाईक्स आणि कमेंटसाठी कोणत्या थराला गेले, हे पाहिल्यानंतर तुम्हालाही लाज वाटेल. ही मुलगी आहे जी रील बनवण्यासाठी कुत्र्याचे दूध पीत आहे, रील व्हायरल करण्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे.' या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. काही लोक या तरुणीची खिल्ली उडवत आहेत. तर इतरही काही लोक या तरुणीला अशा प्रकारे दूध प्यायल्याने रेबीज होऊ शकतो असा सल्ला देत आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, या तरुणीला १४ इंजेक्शन द्या. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, रिल्समुळे लोकांच्या विवेक बुद्धीवर परिणाम झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीने प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार होतात, असे म्हटले आहे. तर, एका व्यक्तीने अशा व्हिडिओवर बंदी घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर