VIDEO: असाही मृत्यू होऊ शकतो! बहिणीच्या लग्नात डान्स करताना तरुणीला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO: असाही मृत्यू होऊ शकतो! बहिणीच्या लग्नात डान्स करताना तरुणीला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली

VIDEO: असाही मृत्यू होऊ शकतो! बहिणीच्या लग्नात डान्स करताना तरुणीला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली

Updated Feb 09, 2025 10:54 PM IST

लग्नाच्या संगीत कार्यक्रमात डान्स करताना अचानक एक तरुणी जमिनीवर कोसळली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. लोकांना काही समजेपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तरुणीला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली
तरुणीला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली

मध्य प्रदेशातील विदिशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉन्सर्टमध्ये डान्स करताना अचानक एक तरुणी स्टेजवरच कोसळली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. तिथे उपस्थित लोकांना काही समजण्याआधीच मुलीचा श्वास थांबला होता. मगधाम रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. इंदूर येथील परिणीता जैन असे मृत तरुणी नाव आहे.

मृत तरुणी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी विदिशा येथे आली होती. डान्स फ्लोअरवर नाचत असताना ती बेशुद्ध होऊन स्टेजवर कोसळल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. नृत्य करताना मुलीला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ती स्टेजवरच पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

लग्नसमारंभाला उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने, जो व्यवसायाने डॉक्टर होता, मुलीला सीपीआर देण्याचा ही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. कोणतीही हालचाल न दिसल्याने मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घरच्यांनी सांगितले की, परिणीता तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाने खूप खूश होती. तिने एमबीएचे शिक्षण घेतले होते आणि सध्या ती खासगी नोकरी करत होती. घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला डान्सची आवड होती. जवळपास महिनाभरापासून ती लग्नाची तयारी करत होती. पण या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला असून घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ पाहून एवढ्या निरोगी व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो, अशी भीती लोकांना सतावत आहे.

तरुणीच्या मृत्यूनंतर लग्न घरावर शोककळा पसरली आहे. लग्न रविवारी होणार होते मात्र शनिवारीच लग्नाचे विधी आटोपून विवाह समारंभ उरकला गेला. परिणीताचा स्टेजवर डान्स करतानाच व्हिडिओ रविवार समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वडील इन्वेस्टमेंट कंपनीत शाखाप्रमुख -

इंदूरच्या साउथ तुकोगंज येथे राहणाऱ्या परिणीताचे वडील सुरेंद्र कुमार जैन इंदूर मधील विजयनगर येथे एका इन्वेस्टमेंट कंपनीत ब्रांच हेड पदावर आहेत. मुलीच्या मृत्यूने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर