मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 28, 2024 06:04 PM IST

Girl die due to heart attack : बहिणीच्या हळदीत एका तरुणीचा (heart attack )अचानक मृत्यू झाला. तरुणी काही मैत्रिणींसोबत डान्स करत होती. डान्स करताना अचानक जमिनीवर कोसळली ती परत उठलीच नाही.

बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक
बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून वाढत्या गर्मी दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) मृत्यू होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. प्रौढ व्यक्तीबरोबरच मुले व तरुण-तरुणींमध्येही हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना यूपीमधील मेरठ जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे लिसाड़ी गेट पोलीस ठाणे क्षेत्रातील अहमदनगरमध्ये चुलत बहिणीच्या हळदीत एका तरुणीचा (die due toheart attack )अचानक मृत्यू झाला. तरुणी काही मैत्रिणींसोबत आपल्या चुलत बहिणीच्या हळदी कार्यक्रमात डान्स करत होती.

ट्रेंडिंग न्यूज

डान्स करताना अचानक ती जमिनीवर कोसळते व त्यातच तिचा मृत्यू झाला. यावेळी तिच्यासोबत डान्स करणाऱ्या मुलींनी आरडाओरडा करून नातेवाईकांना बोलावले. तरुणीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. तरुणी डान्स करताना जमिनीवर कोसळतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणीच्या मृत्यूने लग्न घरावर शोककळा पसरली.

ही घटना लिसाडी गेटच्या अहमदनगर गल्ली नंबर२ मधील आहे.येथे राहणाऱ्या आफताब यांच्या मुलीचे रविवारी लग्न होते. त्यापूर्वी त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी घरात नाच-गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. नवरीची चुलत बहीण रिमशा गल्लीतील तरुणींसोबत डान्स करत होती. रिमशा डान्स करताना अचानक जमिनीवर कोसळली. रिमशा जमिनीवर कोसळताच मुली ओरडओरडा करू लागल्या. त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र रिमशा उठली नाही. नातेवाईकांनीही रिमशाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या शरीरातून कोणतीच हालचाल दिसत नव्हती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

डॉक्टरांनी सांगितले की, डान्स करताना रिमशाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. रिमशाच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिच्या कुटूंबीयांनी आक्रोश केला व लग्नाचा कार्यक्रम स्थगित केला. तरुणी डान्स करताना काही लोक तिचा व्हिडिओ बनवत होते. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, युवती डान्स करताना अचानक जमिनीवर पडते. पोलिसांनी सांगितले की, नाचताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. कुटूंबाने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

IPL_Entry_Point