अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी, लग्नही मोडलं; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनं स्वत:ला पेटवून घेतलं!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी, लग्नही मोडलं; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनं स्वत:ला पेटवून घेतलं!

अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी, लग्नही मोडलं; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनं स्वत:ला पेटवून घेतलं!

Published Feb 12, 2025 10:36 PM IST

प्रियकरामुळे लग्न तुटल्याने बुलंदशहरमध्ये एका २२ वर्षीय तरुणीने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

उत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहरमधील बीवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीने जीवन संपवले आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात तिने आपली संपूर्ण कहाणीच सांगितली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लग्न तुटल्यानंतर नाराज झालेल्या तरुणीने  स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोंद्वारे तिला धमकावले आणि दोन लाख रुपयेही उकळले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला.

ही घटना बीवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. सिकंदराबादच्या सर्कल ऑफिसर (सीओ) पौर्णिमा सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिने शेजारचा तरुण राकेश शर्मावर गंभीर आरोप केले आहेत. चिठ्ठीनुसार, तरुणाचे राकेश सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते. त्यावेळी आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. त्यानंतर तो तिला हे फोटो व व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने तरुणीकडून दोन लाखांहून अधिक रक्कम उकळली होती. जेव्हा तिने भेटण्यास नकार दिला तेव्हा त्याने फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली.

राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मुलीने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. राकेशने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. राकेशच्या आई-वडिलांवरही महिलेने आरोप केले आहेत. सुसाईड नोटनुसार, राकेशने महिलेकडून दोन लाख रुपये उकळले होते आणि भेटण्यास नकार दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

तीन मार्च रोजी होते तरुणीचे लग्न -

दरम्यान, तरुणीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते. ३ मार्च रोजी हे लग्न होणार होते. तरुणीच्या प्रियकराने तिच्या लग्नाला विरोध करण्यास सुरुवात केला. आरोपीने प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला फोन करून त्याला संपूर्ण प्रेमकहाणी सांगितली.  त्यानंतर तिचे लग्न मोडण्यात आले.  यामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. याचा संबंधित तरुणीलाही धक्का बसला. तिने घरात ठेवलेले थिनर अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. स्थानिक रुग्णालयात उपचारानंतर तिला मेरठला नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. महिलेच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून राकेश शर्मा, त्याचे आई-वडील आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशच्या आईला टाकून अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर