Viral Video: फेमस होण्यासाठी काय पण, रील बनवण्यासाठी तरुणीनं माकडासोबत...; व्हिडिओ व्हायरल-girl celebrating rakshabandhan with monkey video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: फेमस होण्यासाठी काय पण, रील बनवण्यासाठी तरुणीनं माकडासोबत...; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: फेमस होण्यासाठी काय पण, रील बनवण्यासाठी तरुणीनं माकडासोबत...; व्हिडिओ व्हायरल

Aug 21, 2024 05:44 PM IST

Viral News: तरुणीचा माकडासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

तरुणीचा माकडासोबतचा व्हिडिओ व्हायरल
तरुणीचा माकडासोबतचा व्हिडिओ व्हायरल

Girl Celebrating Rakshabandhan With Monkey: संपूर्ण देशभरात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. तर, भाऊ सदैव बहिणीचे रक्षण करेल, असे वचन देतो. मात्र, सोशल मीडियावर आगळ्या- वेगळ्या रक्षाबंधनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याची कल्पना आतापर्यंत कोणीही केली नसेल. या व्हिडिओ एक तरुणी चक्क माकडासोबत रक्षाबंधन साजरा करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी माकडांमध्ये बसलेली दिसत आहे. तसेच माकडांशी खेळत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहे. या दरम्यान अनेक माकडे इकडून तिकडे उड्या मारत आहेत. व्हिडिओत तरुणी माकडांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहे. पण माकडाने तिच्या डोक्यावर उडी मारली. यानंतर मुलगी म्हणाले की, 'भाऊ असे गिफ्ट कोण देते? तू असे केलेस तर मी तुला जाऊ देणार नाही.' माकडांसोबत रक्षाबंधन साजरा करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ ४.७ कोटी लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे हैदराबाद विमानतळावर पाणी

हैद्राबादमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.असंख्य लोक अडकल्याने शहरातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पावसामुळे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाण्याची गळती झाल्याने विमानतळाच्या आतील लोकांना चालणे कठीण झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरजीआयएच्या अधिकृत एक्स हँडलनेही यावर प्रतिक्रिया दिली. ही पाणी गळती दर्शविणारा एक व्हिडिओ सीरिश या युजरने एक्सवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये छतावरून जमिनीवर पाणी पडताना दिसत आहे. लोकांना ओल्या मजल्यावर चालता येऊ नये म्हणून विमानतळ प्रशासनाने बॅरिकेड लावले आहे. पाणी कमी होत असल्याने ही घटना पाहण्यासाठी तुरळक गर्दी जमली.

विभाग