धक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला-girl bleeds to death after sex boyfriend was busy for hours in searching remedy online gujarat news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला

धक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला

Oct 01, 2024 08:35 AM IST

girl bleeds to death after sex : गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सेक्सदरम्यान, अतिरक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी तिला दवाखान्यात नेण्याऐवजी प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला. वेळत उपचार न मिळाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला.

 सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला
सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला (Shutterstock)

girl bleeds to death after sex : गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्स दरम्यान, अतिरक्तस्त्राव झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. यावेळी तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तिचा प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला. तरुणीला वेळत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही नर्सिंगची विद्यार्थिनी होती. २३ सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवल्यावर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला होता. हे पाहूनही तिच्या  प्रियकराने मात्र, ऑनलाइन उपचार शोधण्यात वेळ वाया घालवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीला रक्तस्त्राव होत असतांना तिला रुग्णालयात नेण्याऐवजी किंवा वैद्यकीय मदत घेण्याऐवजी आरोपी प्रियकराने रक्तस्त्राव रोखण्यासाठी काय करावे, यासाठी इंटरनेटवर माहिती शोधत राहिला. पोलिसांनी एका वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले की, रक्तस्त्राव झाल्याचे पाहूनही आरोपीने तरुणीशी पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याचाही  प्रयत्न केला. जलालपूर पोलिसांनी प्रियकरावर सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवसारीचे पोलिस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, फॉरेन्सिक अहवालात तरुणीचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे झाल्याचे पुढे आले आहे. तरुणाने १०८ किंवा वैद्यकीय मदतीवर कॉल करण्याऐवजी त्याने मित्रांशी संपर्क साधला व त्यांची वाट पाहिल्यानंतर तरुणीला खासगी वाहनाटुन्न दवाखान्यात हलवले. तरुणीला आयव्ही फ्लुइड, रक्त व औषधांसह तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता.

शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी ही नवसारी येथील नर्सिंग कोर्सच्या प्रथम वर्षात शिकत होती. तीन वर्षांपूर्वी ती आरोपी तरुणाला पहिल्यांदा भेटली होती. दोन वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. सुमारे सात महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.

सात महिन्यांपासून होते रिलेशनशिपमध्ये

सात महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २३ सप्टेंबरला काही खासगी वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. या साठी त्याने हॉटेलल बूक केले. या ठिकाणी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान, तरुणीच्या गुप्तांगातून अति रक्तस्त्राव होऊ लागला. हे माहिती असतांना देखील आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडल्यावर त्याने तिला तातडीने दवाखान्यात न नेता हॉटेलमध्ये ६० ते ९० मिनिटे घालवली. यानंतर तिला दवाखान्यात नेले. मात्र, दुपारी सव्वादोन वाजता रुग्णालयाने तरुणीला मृत घोषित केले. हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणाने रक्ताचे डाग साफ केले. स्थानिक न्यायालयाने आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Whats_app_banner