मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 25, 2022 10:15 AM IST

गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला.

गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू
गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

सावत्र आईने तीन लहान मुलांना विष खायला घालून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला. ही घटना झारखंडमधील गिरिडाह इथल्या रोहनटांडमध्ये घडली.

रोहनटांड गावातील सुनील सोरेन यांची पहिली पत्नी शैलीन मरांडी यांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने झाला होता. त्यांना एक मुलगी आणि ४ मुले होती. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुनील सोरेन यांनी सुनीता हांसदा हिच्याशी लग्न केलं होतं. सुनीता आता गर्भवती असून लग्नानंतर सुनीलसोबत ती रोहनटांडमधील घरी राहते.

दुर्गापुजेआधी सुननीता हांसदा सर्व मुलांना आजी आजोबांकडे सोडून आपल्या पतीसोबत माहेरी गेली होती. तिथून सुनील कामासाठी बेंगळुरूला गेला. दरम्यान, बुधवारी सुनीता एकटीच रोहनटांड इथं आली. तेव्हा सोबत तिने विष आणि चिकन आणलं होतं. दोन दिवसांपासून आजी आजोबा घरी नसल्याचा फायदा उठवत सुनीताने भात आणि चिकन केले.

सावत्र मुलांना सुनिताने जेवणात विष कालवून स्वत: हाताने घास भरवला. तर जेवणाची चव चांगली नसल्याने एकाने खाल्लं नाही. तिघांपैकी दोघांची तब्येत बिघडायला लागली. तेव्हा तिने दोघांनाही आजी आजोबांच्या घरी झोपवलं आणि तिथून फरार झाली.

WhatsApp channel

विभाग