उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये एक खळबळजनक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला एका घरात गेल्या ८ वर्षापासून मोलकरणीचे काम करत होते. ती आपल्या मालकाच्या कुटूंबासाठी जे जेवण बनवत होती, त्यामध्ये स्वत:ची लघवी मिसळत असे. मात्र यामुळे हळूहळू संपूर्ण कुटूंब आजारी पडू लागले. या किळसवाण्या कृत्याचा पर्दाफाश झाला जेव्हा मालकाने आपल्या किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले, ज्यामध्ये मोलकरणीचे कृत्य कैद झाले.
गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या एका रिअल एस्टेट व्यावसायिक व त्याचे कुटूंब गेल्या काही महिन्यापासून गंभीररित्या आजारी पडले होते. संपूर्ण कुटूंबीय पोट व यकृताच्या रोगांनी त्रस्त होते. सुरुवातीला सामान्य इन्फेक्शन समजून डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले गेले. मात्र प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती.
जेव्हा प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली तेव्हा त्यांना जेवणात काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यानंतर कुटूंबाने आपल्या किचनमध्ये तसेच घरातील अन्य भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. जेणेकरून जेवणाच्या तयारीवर व बनवण्याच्या पद्धतीवर नजर ठेवता येऊ शकेल. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दृष्य पाहून कुटूंबीयांना धक्का बसला. घरात काम करणारी मोलकरीण रीना जेवण बनवताना त्यामध्ये लघवी मिसळत होती. हे किळसवाणे कृत्य पाहून कुटूंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.
पीडित कुटूंबाने आपल्या तक्रारीत म्हटले की, मोलकरीण त्यांच्याकडे ८ वर्षापासून काम करत होती. गेल्या अनेक वर्षापासून तिच्याकडून असे किळसवाणे कृत्य केले जात होते. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, काही महिन्यापासून कुटूंबातील लोक लीवरच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातील इन्फेक्शन समजून उपचार केले मात्र दिलासा मिळाला नाही.
त्यानंतर किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. फुटेजमध्ये घरात काम करणारी मोलकरीण एका भांड्यात लघवी करून त्यामध्ये जेवण बनवत होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आली. तक्रारीच्या आधारे क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. आरोपी महिला रीना हिला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली असून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी महिला शांतिनगर येथील रहिवासी आहे. तिने सांगितले की, मालक तिच्यावर नेहमी नजर ठेवत होते, तसेच थोडी जरी चूक झाली तरी ओरडत होते, त्यामुळे त्यांच्या जेवणात लघवी मिसळली.
संबंधित बातम्या